पो.डा. वार्ताहर, रत्नागिरी :
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक /मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
मतदारांसाठी भेटण्याचे ठिकाण व मोबाईल क्रमांकाची माहिती खालील प्रमाणे आहे
निवडणूक निरिक्षक, सर्वसाधारण भुवनेश प्रताप सिंग (आय ए एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-8767236614 असा आहे.
निवडणूक निरिक्षक, पोलीस सुधांशु शेखर मिश्र (आय पी एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-7620444645 असा आहे.
निवडणूक निरिक्षक, खर्च अंकुर गोयल (आय आर एस) सायंकाळी 4 ते दुपारी 6 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-8766981846 असा आहे.