पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान घडत असलेल्या घडामोडींमध्ये एकी कडे काँग्रेस कडून आपल्या दिवंगत पती आणि चंद्रपूरमधून निवडून आलेले एकमेव काँग्रेस चे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी संघर्ष करत खेचून आणणारी ढाण्या वाघाची वाघीण आपल्या मतदारांच्या समस्यांसाठी दुख्खातूनही स्वतःला सावरत जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी उभी ठाकलेली वाघीण आज मतदानाचे हक्क बजावताना पतीच्या आठवणींच्या अश्रुनी डोळे पाणावले, परंतु यामुळे आपल्या साठी खंबीर उभी ठाकलेली हि वाघीण आठवणींनी डळमळीत तर होऊन पुन्हा विलाप करणार आणि जनतेच्या समस्या जैसे थे राहू नये अशीच चिंता कैक मतदारांच्या मनात निर्माण झाल्याचे चर्चेत आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्याप्रति सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु पतीचा गड राखण्यासाठी संघर्षरत उभी राहिलेली प्रतिभाताई लढताना राणी लक्ष्मीबाई ची आठवण करून देत होती पण मतदार रुपी लेकरांना सांभाळणारी माय माउली लेकरांसमोर कधीच विलाप करत नाही, लेकरांचे मनोधैर्य त्याने डळमळीत होते हे त्या माउलीला माहित असते, पण कधी कधी अशा परिस्थितीमध्ये या गोष्टींकडे पब्लिसिटी स्टन्ट म्हणून पहिले जाते.
एकीकड़े त्या लढायच्या गोष्टी करता त्यावेळी धाकड मातब्बर उमेदवाराची झलक पाहायला मिळते पण असा कॅमेरा समोर अश्रू आणून आपल्या भावनांचे, आणि आठवणींचे प्रदर्शन मांडणे त्यांना या क्षणी शोभले नाही, त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे. अख्खा प्रचार ताठ मानेने केला आणि पसार माध्यमांच्या प्रतिनिधींनसमोर हे त्यांच्या कडून जनतेला अजिबात अपेक्षित नव्हते, असो मतदार यामुळे संभ्रमात आहेत, त्यात वरोऱ्यात मतदान करण्यासाठी दारू आणि पैसे वाटलं गेल्याचे सुद्धा वृत्त वादाला सारखे पसरल्याने नक्की खरे काय आणि फसवे काय ? असा प्रश्न मतदारांना पडलाय पण ते आपला निर्णय देतील, जो निकालाच्या दिवशी पाहण्यास मिळेल ज्याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.