धामणगाव बढे येथे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उसळला जनसागर….!
महायुतीचे उमेदवार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू— धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा निर्धार
पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुती तसेच मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ बुलढाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती….!
यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हजारोच्यावर कार्यकर्त्यांनी धामणगाव बढे येथे सभेसाठी उपस्थिती लावली होती…!
यावेळी त्या ठिकाणी लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब, भाजपाचे नेते योगेंद्रजी गोडे, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे, श्री बलदेवराव चोपडे, जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी बुलढाणा तालुका अध्यक्ष डी एस लहाने सर, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पृथ्वीराज संजय गायकवाड,भाजपाचे सुनील देशमुख, ऍडव्होकेट मोहन पवार, रयत क्रांती जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथनकर यांच्यासह बुलढाणा तसेच मोताळा येथील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच सर्व शिवसेना,युवासेनेचे शहर प्रमुख उपशहरप्रमुख तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!