पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : तुम्ही मला आशीर्वाद दिला तर आपल्या चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचा आवाज दिल्लीत पोहचवेल, अशी ग्वाही भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
व्यापारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायती समिती सदस्य, खरेदी विक्री संघाचे संचालक, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच यांची बैठक वणी तालुक्यातील चिखलगाव येथील सुविधा लॉनमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
ही देशहिताची आणि विकासाची निवडणूक असून आपल्या मतदारसंघाचा विकास पूर्ण ताकदीने करणार असल्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला. विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार असून आपला मतदारसंघ देशातल्या टॉप १० मतदारसंघात आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजयराव पिदूरकर, दिनकरराव बावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड विनायकराव एकरे, रवी बेलुरकर, विजयजी चोरडिया, संजय पिंपळशेंडे, अशोकजी शूर, तुकाराम माथणकर, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, सतिष नाकले, अविनाश लांबट, सुरेश बोलणेवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या विकसीत भारताच्या संकल्पाला आपल्याला विजयी करायचे आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.