नवरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे कट्टर सक्रिय कार्यकर्ता तेजराम गहाणे यांनी काल माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून तथा नवरगावचे सरपंच राहुलभाऊ बोडणे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात एकजुटीने काम करण्यास मदत होणार असून वॉर्ड क्रमांक ६ मध्ये अधिक काँग्रेस बळकट होणार आहे. तेजराम गहाणे यांचा वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कोहळी समाजामध्ये प्राभल्य आहे. तसेच नवरगाव येथील इंदिरानगर मध्ये राहत असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ता शैलेश कामडी यांनी सुद्धा माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. दोन्ही बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून अभिनंदन केले. याप्रसंगी माजी तालुका अध्यक्ष अरुणभाऊ कोलते, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, सरपंच राहुल बोडणे, शहर अध्यक्ष सुशांत बोडणे, ग्रा. पं. सदस्य पंकज उईके, पवन जैस्वाल, श्रीकांत हेडाऊ, उपाध्यक्ष सर्फराज पठाण, आनंद मेश्राम, ठोनू जैस्वाल, संजय सोनकुसरे, सोपान कामडी, प्रमोद कामडी, जगदीश लोखंडे, अक्षय पाकमोडे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.