पो.डा. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सुमारे ११० कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सावंतवाडी शहरातील भाजी मार्केट, सावंतवाडी दोडामार्ग शासकीय विश्रामगृह, बॅ.नाथ पै सभागृह या विकासकामांचे लोकार्पण तर रमाकांत आचरेकर क्रिकेट गॅलरीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.