महाजेनको ने केली 18 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्वाने पुनर्नियुक्ती – सुटीच्या दिवशी नियुक्ती आदेश
राजकीय लागेबांध्यांतुन नियुक्तीची शक्यता
चंद्रपूर, पोलीस डायरी वार्ताहर
नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (महाजेनको) नियमित नोकरभरतीमधील आदेश रोखून ठेवत सुटीच्या दिवशी ५ मे रोजी १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना २ वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्तिचे आदेश काढले. सेवानिवृत्त झालेल्या आणि कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या या अभियंत्यांद्वारे चुकीचे काम झाल्यास जबाबदारी कशी निश्चित करायची?, यावरून अनेक वीज केंद्रात नवीन वाद पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भविष्यात महाजेनको कोणत्याही कारणासाठी अधिकाऱ्यांनी संप किंवा आंदोलनासारखे हत्यार उपसल्यास वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना दोन वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली आहे. महाजेनकोच्या एचआर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापकांनी बुद्धजयंतीनिमित्त सुटी असतानाही ५ मे रोजी नियुक्तीचे आदेश काढले. महाजेनकोच्या वेगवेगळ्या वीज केंद्रातून हे अभियंते नुकतेच सेवानिवृत्त झाले.
विशेष असे कि, त्यांची कंत्राटी तत्त्वावर सेवा घ्यावी, म्हणून प्रकाशगडावरील काही वरिष्ठ अधिकारी व ऊर्जा मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी आग्रही होते. जानेवारी ते मार्चदरम्यान हे सर्व अठराही अभियंते हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्यासाठीच मार्चमध्ये हि पूर्वनियोजनानुसार जाहिरात काढण्यात आली होती. १७ मार्चपर्यंत त्यांनी अर्ज सादर करावे, त्यानंतर महिन्यातच त्यांची कंत्राटीतत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. वसुलीला ब्रेक लागल्याचे कारण दाखवून वीज वितरण कंपनी वीजनिर्मिती कंपनीला वेळेत पैसे देत नाही. तसेच वाढते खर्च पाहता महाजेनको तोट्यात चालत असल्याचे कारण सांगितले जाते, असे असतानाही या अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारा निधी महाजेनको कोठून उभा करणार आहे? याबद्दल वैचारिक खलबते कार्यालयीन परिसरात होत आहेत . या पूर्व नियोजित नियुक्त्यांसाठी म्हणून कार्यकारी अभियंत्यांच्या सरळसेवा भरतीचे नियमित आदेश रोखून धरण्यात आले आहेत. कोरोनापासून एकही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही.
नव्याने नियुक्तकेलेल्या सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी कंत्राटदारांची फौज पडद्यामागून काम करीत आहे. कंत्राटदारांना लाभ व्हावा या हेतूने अनेक अधिकारी महाजेनकोत कार्यरत असतात. अनेक अधिकारी कंत्राटदारांच्या मदतीने ५० टक्के छुप्या भागीदारितही काम करीत असल्याचे पाहायला मिळते काही अभियंत्यांची मुले इतरांच्या नावाने काम घेऊन कारभार करीत आहेत. महाजेनकोतील अनेक अधिकाऱ्यांना र मिळत असलेल्या राजकीय पाठिंब्यामुळेचअधिकाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे लाड पुरविले जान्यामागे कोणत्या तरी मोठे भ्रष्टाचाराची चाहूल असल्याची चर्चा सुरू आहे.