पो. डा. प्रतिनिधी, नागपूर
बुटीबोरी: महाराष्ट्र प्रदेश युवक काग्रेसचे अध्यक्ष कुणाल राउत व प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव व एकता कामगार संघटनेचे अध्यक्ष मुजीब पठान यांच्या नेत्वृत्वात व शेकडो कामगारांच्या उपस्थितीत ESIC हास्पीटलच्या नियोजीत जागेवर हास्पीटल उभारणी करीता जानीव पूर्वक होत असलेल्या विलंबामुळे कामगार व कुटुंबातील सदशांना जो त्रास सहन करावा लागत आहे, ESIC च्या जाचक अटीमुळे कामगारावर जो अन्याय होत आहे, कामरांना न्याय मिळवुन देन्याकरीता शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वैधन्याकरीता बेसरम वनस्पतीचे झाडे लावुन अनोखे आंदोलन करन्यात आले. यावेळी हॉस्पिटलच्या जागेवर प्रतीकात्मक स्वरूपात पेशंटला बेडवर झोपवून उपचार करण्यात आले. ESIC प्रशासन व सरकारचा अशा प्रकारे निषेध करण्यात आला. यावेळी ESIC प्रशासन व सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या त्यांतर शेकडो कांग्रेस कार्यकर्ते व कामगार यांच्या वतीने ESIC डीस्पन्सरीला कामगाराच्या समस्या बाबत निवेदन देण्यात आले, त्यानंतर ESIC च्या अलगर्जी पणामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने बऱ्याच कामगारांना प्राणास मुकावे लागले असेच दिनशों कंपनीतील कामगार भूषण पन्नासेला ESIC ने रेफर केलेल्या दवाखान्याचे मागील बील न दिल्याने उपचार करण्यास मनाई केली त्याला तातडीच्या उपचाराची गरज होती परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने सदर कामगाराचा मृत्यू झाला या बाबतीत कामगाराच्या मृत्यूला जबाबदार ठरवून ESIC अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या करिता पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस उपआयुक्तांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मा. मुजीब पठान व मा कुनाल राउत यांनी कामगारांना न्याय मिळवून देन्याकरीता करीता कटीबद्ध असल्याचे सांगीतले, नागपुर ग्रामीन मधे ५९५७७ तर सः पुर्ण विधर्भात ३२०५४४ नोंदनीकृत विमाधारक असून ३२०५४४ प्रत्येक कामगारामागे ३.७५ यानुसार कुटुंब सदस्य धरल्यास १२०२०४० एवढ्या मोठ्या संखेला स्वास्थ्य सेवा देण्याकरीता ESIC कड़े हास्पीटल उपलब्ध नसल्याची माहीती मुजीब पठान याःनी दिली.
बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशियातील सर्वात मोठी व पंचताराकिंत सुवीधा असलेली एमआयडीसी असल्याचा शासनाच्या वतीने दिंडोरा पीटला जातो, व सर्व आवश्यक सुविधा असल्याचे सांगितलं जाते, परंतु वास्तविकता काही वेगळीच असुन, १० वर्षापुर्वी तत्कालीन काग्रेस सरकारने बुटीबोरी एमआयडीसीतील कामगारांची संख्या लक्षात घेता कामगारांना चांगल्या स्वास्थ्य सुवीधा मिळाव्या करीता २०० खाटांचे हास्पीटल मजुर केले व त्याकरीता आवश्यक निधी सुद्धा मंजुर केला होता. दरम्यान केन्द्रातील सरकार बदलले तेव्हा पासुन ९ वर्षाचा कार्यकाळ लोटुन गेला परंतु सरकार व प्रशासनाच्या कामगाराप्रती असलेल्या उदासीनतेच्या धोरनामुळे ESIC हास्पीटलचे काम गड्डा खोदन्या पलीकडे गेलेले नाही.
नियोजीत हास्पीटल झाले तर विदभातील सर्व ESIC मधे नोंदनीकृत कामगार व त्याच्या परीवारातील सदस्यांना स्वास्थ्य सुवीधा मिळाल्या असत्या, आज बुटीबोरीत हजारांच्या संखेने कामगार नोंदनीकृत असुन जी डीस्पेंसरी आहे तेथे डाक्टर, कर्मचारी औषधे उपलब्ध नसतात, लहान सहान बीमारी करीता नागपुरला पाठवीले जाते तीथेही तेच हाल असून तेथून सुद्धा सरकारी मेडीकलला पाठवीले जाते. मासीक पगारातून ५.५% या प्रमाने कामगार ईएसआयसीला योगदान देत असतो. मेडीकललाच जर उपचार घ्यावा लागत असेल तर ईएसआयसीत ५.५% योगदान देन्याचा काय अर्थ? असा प्रश्न कामगारांना पडत आहे. आजार काळातील वेतन मिळन्या करीता व दुय्यम दर्जाचे उपचार मिळन्याकरीता मागील ७८ दीवसाच्या हजेरीची जाचक अट कार्यस्थळावरच अपघाती वेतन लाभ, कामगारांना सुवीधा मिळुच नये करीता जाचक नियम बनवल्याने कामगारांना ESIC च्या सुवीधा चा लाभच मिळत नाही त्यामुळे कामगारात मोठ्या प्रमानात असंतोष आहे.
कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसनार नसल्याचे मान्यवराःनी सागीतले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रणित जांभुळे, असिफ शेख, पंकज सावरकर सचिव सौरभ श्रीरामे, नेहा नकोसे, फैजल नगानी, अभिषेक धवड, अक्षय डोरलिकर, अक्षय घटोळे, आश्विन बैस, फजलुर रेहमान कुरैशी, इरशाद शेख, संदीप जैन, जितेंद्र वेलेकर, सचिन वासनिक, सहसचिव विवेक प्रधान, योगेश गोमासे, नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथीलेश कण्हेरे, उपाध्यक्ष आशिष मंडपे, नागपुर जिल्हा एन एस उ आयचे अध्यक्ष अनिरुध्द पांडे व त्यांची शहरचे पदाधिकारी तसेच सतीश पाली, निषाद इंदुरकर, चेतन तरारे आदि उपस्थित होते