पोलीस डायरी वार्ताहर, पुणे: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळावे. महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय, त्याचा निषेध करतोय. अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाही. त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणे, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेसतर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा.”
-कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड
मी जाणारच – पवार
‘टिळक पुरस्कारासाठी मी स्वत:च पंतप्रधानांची वेळ मिळवून दिली असल्याने तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे
असे खुद्द शरद पवार यांनी सांगितल्याचे कथन युक्रांदचे डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केले.