पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते आज म्हाडाअंतर्गत बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील पात्र गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.
कामगार मंत्री सुरेश खाडे, गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हाडा आणि गिरणी कामगार संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.