पो.डा. वार्ताहर , नागपूर :
सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ लॉ कॉलेज चौक ते बजाज नगर चौक पर्यंत रोड शो
नागपूर. भारतीय जनता पार्टी महायुतीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ बॉलीवूड स्टार प्रचारक व खासदार कंगना रनौत यांच्या भव्य रोड शो चे आयोजन उद्या रविवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.१७) दुपारी १ वाजता बॉलीवूड स्टार प्रचारक व खासदार कंगना रनौत यांच्या रोड शो ला लॉ कॉलेज चौक येथून सुरुवात होईल व बजाज नगर चौक येथे समापन होणार आहे. या रोड शो मध्ये मोठ्या संख्येत पश्चिम नागपूरच्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा पश्चिम नागपूरचे प्रभारी माजी महापौर संदीप जोशी, निवडणूक प्रमुख संदीप जाधव, मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे यांनी केले आहे.