पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ज्ञानेंद्र आर्य,तालुका प्रतिनिधि बल्लारपूर : बुधवार दि. 13/11/2024 रोजी दुपारी 1 वाजता बल्लारपूर शहरातील बस्ती येथील गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक कनैय्या कुमार यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले व उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना प्रचंड मतेने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जैनुद्दीन झवेरी,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैध, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे,माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,
शहराध्यक्ष अब्दुल करीम,दिनेश चोखारे,रोशनलाल बिट्टू,पवन भगत, आम आदमी पार्टी के किशोर पुसलवार ,आर पी आय के अशोक नीमगड़े काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय निरीक्षक जफर हैदर, सूर्यप्रभा शेट्टीयार, बाबासाहेब वासाडे, उपस्थित होते.
याप्रसंगी जाहीर सभेला संबोधित करताना कनय्या कुमार म्हणाले की आपला श्रेत्र मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो, या भागात बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरातमधील लोक राहतात, ते सर्व एकत्र राहतात.
देशात जेव्हा जेव्हा अंधार असतो तेव्हा चंद्रपूर जिल्हा त्यांना औष्णिक विजेच्या माध्यमातून प्रकाश देतो.
सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत या श्रेत्रातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराने सुमारे 48 हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र आजच्या या जाहीर सभेचे वातावरण पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत हे 50 हजारांहून अधिक मतांनी निवडून येतील, असे दिसते.संपूर्ण राज्यात बदल होत असून येथेही हे बदल होनार.
या जाहीर सभेचे संचालन माजी गटनेते देवेंद्र आर्य यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडी (काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि रिपाई) चे नेते व कार्यकर्त्यांसह हजारो सामान्य नागरिक उपस्थित होते.