पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आद.खा.शरदचंद्र पवार यांची “सिल्व्हर ओक” निवासस्थानी भेट घेवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकसंघपणे आपल्या आणि राष्ट्रवादी पक्षासोबत असल्याची माहिती पवारसाहेबांना दिली.पवार साहेबांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकसंघपणे पक्षाच्या पाठीशी असल्याबाबत त्यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाल्याबाबत आम्हाला चर्चे दरम्यान सांगितले,आणि या एकजुटी आणि पाठिंब्याबद्दल आम्हा सर्वांचे मा.शरद पवारांनी “अभिनंदन” केले.
या प्रसंगी जिल्ह्यात पाऊस, पिकांची, पेरण्यांची परिस्थिती कशी आहे अशी मोठ्या आस्थेने चौकशी केली. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,हिराचंद बोरकुटे,अरुण निमजे, जयंत टेमुर्डे,बादल उराडे,संजय वैद्य,राजेंद्र आखरे,आल्हाद बहादे,पंकज जगताप,शुभांगी साठे,वंदना आवळे,पूजा शेरकी,अविनाश ढेंगळे,बंडू भोंगाडे,अरुण सहारे,पावडे,राजू मुरकुटे,उपस्थित होते.