अंभोरे यांनी पक्ष मजबुतीसाठी काम करावे – आ. सुभाष धोटे
हर्षल चिपळूणकर , पोलीस डायरी न्यूज :
लोकसभेतील अभुतपुर्व यशानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने विधानसभेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न कले जाणार आहे. काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश च्या टिळक भवन येथील कार्यालयात सेवा निवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे व व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै रोजी दादर स्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कार्यालयात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे तसेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेत उल्लेखनिय कार्य करणारे व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश श्री. नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, राजुरा विधानसभेचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशानंतर बोलतांना खासदार धानोरकर म्हणाल्या कि काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. श्री.अंभोरे यांच्या पक्ष प्रवेशाने पक्ष आणखी मजबूत होणार असून त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि श्री. सुधाकर अंभोरे यांनी कॉग्रेस पक्षाच्या मजबूतीकरीता कार्य करावे व पक्ष प्रवेशाबद्दल सुधाकर अंभोरे व राहुल तायडे यांना शुभेच्छा दिल्या. या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, यवतमाळ कॉग्रेस कमेटीचे सरचिटणीस संजय खाडे, कॉंग्रेस नेते नानाभाऊ गावंडे, चंद्रपूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष सोहेल रजा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रविण काकडे, हेंमत कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.