नॉर्वेच्या वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाने कॉन्सुल जनरल श्री. अर्ने जान फ्लोलो, यांच्या
नेतृत्वाखाली इंटरपोलिटी कॉमर्सचे श्री कांचन भरत इंगळे यांच्यासह महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था
(MEDA), मुख्य कार्यालय, औंध पुणे, येथे 12 मे 2023 रोजी भेट दिली. सदर प्रसंगी श्री. रवींद्र जगताप
(भा.प्र.से.), महासंचालक, महाऊर्जा श्री. पंकज तगलपल्लेवार. अतिरिक्त महासंचालक, श्री. विजय कोते,
उपसंचालक (लेखा), सर्व महाव्यवस्थापक आणि महाऊर्जाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. रवींद्र जगताप, महासंचालक यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. श्री. आनंद रायदुर्ग,
महाव्यवस्थापक (प्रकल्प) यांनी नवीन व नवीकरणीय ऊर्जा विकासावर तंत्रज्ञान निहाय तसेच संशोधन
आणि विकास उपक्रमांसाठी महाऊर्जाने घेतलेल्या उपक्रमाचे सादरीकरण प्रस्तुत केले. राज्यातील नवीन
नवीनकरणीय ऊर्जा विकासातील केलेल्या प्रगतीबाबत कॉन्सुल जनरल यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी
नॉर्वे सरकार/ तेथील कंपन्यासोबत नवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर सहयोग करण्याच्या विषयावर
चर्चा करण्यात आली. हरित हायड्रोजन, समुद्रीय पवन ऊर्जा निर्मिती, पाण्यावरील तरंगते सौर ऊर्जा
निर्मिती प्रकल्प इ. तंत्रज्ञानाबाबत अधिक देवाणघेवाण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाऊर्जा
सोबत सहकार्य करण्याबाबत कॉन्सुल जनरल यांनी आश्वासीत केले.
ते म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्यातदारांपैकी एक म्हणून, ऊर्जा वापरणाऱ्या देशांच्या
ऊर्जा सुरक्षेमध्ये नॉर्वे हा प्रगतीशील देश आहे. त्याच वेळी, हवामान बदल कमी करण्यासाठी जागतिक
वकील म्हणून, नॉर्वे पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान धोरणासाठी वचनबद्ध आहे. नॉर्वे भारताशी
नॉर्वे-भारत ऊर्जा सहकार्य भागीदारी करण्यास उत्सुक आहे.
तद्नंतर आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.