प्रधान मुख्य वन संरक्षक अधिकाऱ्यांचे सातपुडा जंगलाकडे अक्षम्य दुर्लक्ष; कार्यवाही कोणी करावी यावरून हेळसांड
पो. डा. वार्ताहर, यावल
जळगाव येथे असलेल्या यावल वन विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील यावल पूर्व व पश्चिम कार्यक्षेत्रासह तसेच यावल अभयारण्य सहाय्यक वन संरक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रपाल यांची कार्यालयीन कामकाजाचे मुख्यालय आणि कार्यालय नेमके कुठे आहे तसेच सातपुडा जंगलातील घडामोडींकडे यावल वन विभाग जळगाव मुख्य वन संरक्षक धुळे व प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल – रावेर – चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांसह नागरिकांकडून केला जात आहे.
उक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सातपुडा जंगलातील विविध समस्या आणि कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोणीही गेले असता अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात, हजर एखाद्या कर्मचाऱ्याला विचारले असता साहेब कुठे गेले आहेत त्यावर ते सांगतात साहेब जंगलात गेले आहे, साहेब जळगावला गेले आहे, साहेब अजून आले नाहीत अशी अनेक कारणे दिली जातात, त्यामुळे वनक्षेत्रपाल यांचे वन विभागाचे कार्य नेमके कुठून व कसे चालते याबाबतचे अनेक प्रश्न दडून आहेत.
यावल वन विभाग जळगाव सहाय्यक वन संरक्षक व उपवनसंरक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रपाल हे नेमक्या कोणत्या कार्यालयीन कामकाजानिमित्त बाहेर आहेत, किंवा शासकीय कामानिमित्त बाहेर गेले आहेत,किंवा जंगलात पाहणी करण्यासाठी केव्हा किती वाजता कुठे गेले आहेत, वरिष्ठ कार्यालयात मिटींगला उपस्थित आहेत का? न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात गेले आहेत का? याबाबतचा फलक त्यांच्या कार्यालयात लावण्याची कार्यवाही करावी जेणेकरून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वस्तुस्थिती लक्षात येईल.आणि वनक्षेत्रपाल हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात किंवा नाही हे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून येईल.
संबंधित वनक्षेत्रपाल हे सातपुड्यातील वन विभागातील सर्व घडामोडींचा अहवाल आपल्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांची समन्वय साधून असल्याने आपल्या सोयीनुसार पाठवीत असतात यात महाराष्ट्र शासनाची शुद्ध दिशाभूल आणि फसवणूक केली जात असल्याने यावल- रावेर व चोपडा तालुक्यातील काही कर्तव्यदक्ष वनपाल व वनरक्षक कर्मचाऱ्यांसह सातपुड्यातील आदिवासी नागरिकांमध्ये सातपुडा जंगलाविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
सातपुडा जंगलातील वनपाल यांचे कार्य लक्षात घेतले असता वनपाल यांचे कार्य वनरक्षा करणे आहे, वनपाल वनातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतो,वनपालाची वनातील भूमिका आणि कामगिरी खूप महत्त्वाची आहे, त्याला जंगलाच्या सुरक्षेसाठी आपल्या कार्यालयीन वेळेत नेहमीच सतर्क राहावे लागते आणि जंगलातील समस्या अडीअडचणी याबाबत संघर्ष करावा लागत असतो आणि इत्यादी सर्व माहिती तो आपल्या वनक्षेत्रपालास देत असतो. माहिती दिल्यानंतर मात्र वनक्षेत्रपाल हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमका काय अहवाल पाठवतात.. ? आणि सातपुड्यातील घडामोडी घडामोडीवर नेमकी कार्यवाही काय करतात..? हे कोणालाही समजत नाही.
त्याचप्रमाणे वनरक्षक वनातील पशुपक्षी विविध प्राणी यांच्या संरक्षणासाठी पेट्रोलिंग / गस्त करीत असतात वृक्षरोपण,वनस्पती बी लागवड पेरणी तसेच वाढणाऱ्या वृक्षांची देखभाल करीत असतात.ही कामे वनक्षेत्रपाल वन विभागाच्या कायद्यानुसार तसेच उपलब्ध निधी नुसारच करून घेत आहेत का..? सातपुडा जंगलात,वनात आग लागू नये म्हणून तसेच वृक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून वनक्षेत्रपाल हे वनरक्षकाच्या माध्यमातून शासकीय नियमानुसारच कामकाज करून घेतात का ? वनक्षेत्रपाल हे आपल्या वनरक्षक आणि वनपाल यांच्यावर आपल्या अधिकाराचा दबाव तंत्र वापरून त्यांना गप्प बसून तसेच वन विभाग नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना वनरक्षक पकडून आणि पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवितात,वन मजुरांच्या कामाचा आढावा घेतात, वनातील रस्त्यांची व इतर सुविधांची देखरेख करणे वनातील सर्व लाकडांची पडताळणी करणे आणि उत्पादित लाकडाच्या प्रमाणानुसार वृक्षाचे मूल्यमापन करणे इत्यादी कामे वनरक्षकाचे असले तरी वनरक्षकाचे संबंधित वनक्षेत्रपाल अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीजन्य अहवाल पाठवितात का ? आणि तो अहवाल जळगाव येथील यावल वन विभाग जळगाव कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व यावल वन विभाग जळगाव कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष खात्री न करता दप्तरी का व कशासाठी दाखल करून घेतात ? आणि आज सातपुड्यातील सर्रास सागवानी लाकडाची व इतर मूल्यवान वृक्षतोड व डिंक वनउपज संपत्तीची तस्करी, आणि जागोजागी झालेल्या अतिक्रमणाची तसेच फरार आरोपी पकडले जात नसल्याने आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने इत्यादी वस्तुस्थिती लक्षात घेता कारवाई होत नसल्याने यात संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत आहे का? इत्यादी अनेक प्रश्न यावल रावेर चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांसह नागरिकांमध्ये उपस्थित केले जात असून सातपुडा जंगलाविषयी तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत संबंधित अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची व पुढील योग्य ती कार्यवाही वन मंत्री साहेब करणार काय य कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.