शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
पोलीस डायरी प्रतिनिधी, नागपूर: मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब व वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक श्री मंगेशजी चिवटे साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री रामहरी राऊत साहेब यांच्या आदेशानुसार प्रवीण शर्मा सातत्याने मागील २५ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेना पक्षांत नागपूर शहरात कार्यरत होते, जबाबदारी दिल्यानुसार नागपुरातील रुग्ण सेवेतअसलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये सातत्याने सराहनीय कार्य करीत आहे आणि गरजू पेशंटला उपचाराकरिता दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळून दिल्या बद्दल कौतुक करून,शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष मध्ये पूर्व विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची पद नियुक्ती करण्यात आली. उक्त पदावर नियुक्ती दिल्याबद्दल शर्मा यांनी मा. वरिष्ठांचे आभार व्यक्त केले आणि जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे त्यामध्ये निष्ठावंत कार्य करून गोर गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी अजून जास्त मदत करन्याचे वचन दिले .