पो. डा. वार्ताहर : पक्षांतरण आणि सत्तेत सामील होण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाला जनसामान्य कंटाळले आहेत की काय असा प्रश्न अकोल्यातील एका व्हायरल व्हिडिओने समोर येत आहे. भरोसा कुणावर करावा आणि मतदान कुणाला करावा असं या व्हिडीओ वरून वाटत आहे. अकोल्यातील एका युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलाय. आपल्या टी शर्टवर त्याने ‘मतदान कार्ड फुकट घेता की विकत’ असा मजकूर लिहला आहे. हा युवक अकोला शहरातील बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. हा युवक कोण याचा शोध अजूनही लागला नाही मात्र सध्या सुरू असलेल्या राजकारणाला हा युवक कंटाळला असल्याचं या व्हायरल व्हिडीओमधून दिसून येत आहे.
राज्यातील राजकीय समीकरणे क्षणोक्षणी बदलत असल्याने नागरिकांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. आधी शिवसेना शिंदे गट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेसाठी भाजपसोबत सत्तेत बसला आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ही पक्ष हिरावून घेण्याची पाळी आली असल्याने नागरिकांमध्ये आता कोणत्याही पक्षावर विश्वास नाही. त्यामुळे यापुढील निवडणुकीत मतदान करायचे किंवा नाही असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर ही मतदान कार्ड आणि निवडणूक आयोगावर ही आता चांगलेच जोक व्हायरल होत आहे. यातून लोकशाहीचे होणारे विडंबन समोर येत आहे.