पोलीस डायरी, वार्ताहर, अहिल्यानगर : crime story
प्रेमप्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊजणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली.
याबाबतची माहिती विस्तराने, गीता राठोड़ ही एका प्रेमप्रकरणात मुलीला मदत करीत असल्याचा संशय काही जणांना होता. सोमवारी गीता राठोड हिला मोटारसायकलवरून फिर्यादीच्या राहत्या घरातून स्वप्नील राठोड यांचे नातेवाईक हरीष पवार यांच्या घरी डांगेवाडी येथे नेण्यात आले.
तेथे गीताला आरोपींनी लोखंडी पाईपने व रॉडने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. साक्षीदार हे मध्ये पडले असता, त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.
या वेळी आरोपींनी गीता हिचा गळा आवळनू खून केला व मृतदेह विहिरीत टाकून दिला. याप्ररणी मयत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी स्वप्निल धोंडीराम राठोड, मनिशा सुरेश चव्हाण रा. साकेगाव ता. पाथर्डी, उषा बबन पवार, रा. खाडके ता. जि. अ.नगर, हरेश प्रभाकर पवार, रा. डांगेवाडी, ता. पाथर्डी, किरण रामसिंग राठोड, अजय शंकर जाधव, निलेश रमेश राठोड रा. साकेगाव, ता. पाथर्डी, बबन पवार (पूर्ण नाव माहीत नाही), अभिषेक बबन पवार दोन्ही रा. खांडके, ता. जि. अ. नगर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हरेश प्रभाकर पवार व त्याच्या साथीदारांनी हा प्रकार घडवून आणला आहे, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायदे तपास करीत आहेत.
गीता हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मृतदेह आणला होता. खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली.
गुन्हा नोंदविल्यानंतर गीताच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रेम प्रकरण एकाचे आणि जीव मात्र दुसऱ्याचा गेल्याने हनुमाननगर येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.