पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर :-
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग बघणाऱ्या बुकिंग एजन्सी विरोधात पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हे दाखल करण्यात आले, या बुकिंग एजन्सी ने ताडोबात सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली ताडोबा ऑनलाईन तिकीट बुकिंग एजन्सी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनने केली फसवणूक, गेल्या 3 वर्षात (10/12/21 ते 17/08/23 ) एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रक्कमे पैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा करण्यात आले आहे.
या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल, (1) अभिषेक विनोदकुमार ठाकुर (2) रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. प्लॉट क्र. 64 गुरुद्वारा रोड, चंद्रपूर अशी आहेत एजन्सी संचालकांची नावे असून यांच्याविरुद्ध कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडोबातील विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी केली मोठी कारवाई, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चांगलीच खळबळ उडाली आहे.