पो. डा. वार्ताहर संतोष नाईक वार्ताहर , कोपरगाव :
दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येते सेक्स रॅकेट चालून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचा समक्ष छापा टाकून दोन पिढीत परप्रांतीय मुलींचे सुटका करण्यात आली आहे आणि विजय मावळ या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारात प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैधंदे करण्याचे चांगले धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, माननीय स्वाती भोर एडिशनल एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संदीप मेटके, पीआय प्रदीप देशमुख हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक कृष्णा कुरे शिंदे , दिनेश कांबळे , गणेश काकडे दराडे , हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरवे यांनी केली.