पोलीस डायरी क्राईम रिपोर्टर, जिग्नेश जेठवा, नाशिक : मा पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, नाशिक पोलिस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून विशेष मोहीम राबविली होती. अंबड पोलीस स्टेशन कडील गु. र. नं. ३२६/२०२३ भा.द. वि. कलम १४१, १४३, १४७, १४८, ४२७, ५०४,५०६ सह भा.ह.का. कलम ४/२५ सह फौजदारी कायदा ( सुधारणा) कलम ७ मधील परिसरात दहशत पसरविणारा #wanted आरोपी गौरव पाटील हा दामोदर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी गुप्त बातमीदारामार्फत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार २५०९ चारुदत्त निकम व पोलीस अंमलदार ४९७ भूषण सोनवणे याना मिळाली होती.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून वॉन्टेड आरोपी गौरव उमेश पाटील वय २३ वर्षे व्यवसाय पानटपरी चालक रा. कलाकृती अपार्टमेंट फ्लॅट नंबर २, माउली लॉन्स जवळ, खुटवड नगर, नाशिक यास दि. ०८/०८/२०२३ रोजी दामोदर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपास व कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक, मा श्री. प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त , गुन्हे, मा. श्री. डॉ. सीताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोनि विद्यासागर श्रीमनवार सपोनि प्रवीण सूर्यवंशी, श्रेपोउनि दिलीप भोई , पो हवा किशोर रोकडे पोना योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पो अंमलदार भूषण सोनावणे, मंगेश जगताप भगवान जाधव विठ्ठल चव्हाण व मपोशी. सविता कदम यांनी केलेली आहे.