पो.डा.वार्ताहर, जळगाव : यावल अवैध फर्निचर दुकानांवर आज यावल वन विभागाने कारवाई केली. यात सुमारे १ लाख रूपये किंमतीची वन लाकुड व मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल गावातील शेख असलम शेख असगर (मुन्शी फर्निचर) येथे वन कर्मचार्यांना सह सापळा रचून धाड सत्र राबवले. त्यात विना परवाना अवैध साग नग – 5 (घन मीटर 0.062) तसेच रंधा मशीन – 1 असा एकूण 21984 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
किनगाव येथील रामचंद्र पाटील यांचे अवैध फर्निचर दुकानवर सापळा रचून धाड टाकली असता त्यात दरवाजा फालके 08, पलंग 02, सोफा सेट 01, साग नग 72, चौरंग 04, तसेच लाकूड कट्टर मशीन 01, असा एकूण 75,000 रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
मुख्य वनसरंक्षक ऋषिकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे,यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रविंद्र तायडे, वनपाल राजेंद्र ख़र्चे, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड, अनिल पाटील, वाहन चालक सुनील पाटील यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली.
पुढील तपास वनपाल डोंगर कठोरा, वनपाल वाघझिरा हे करीत आहेत.