पोलीस डायरी, जिग्नेश जेठवा, क्राईम रिपोर्टर, नाशिक : मा. श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथील गुरन. ३०२/२०२३, भादवि कलम ३९५, ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह शस्त्र अधिनियम ४ /२५ व मपोकाक १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात निष्पन्न ९ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोक्का) या कायद्यान्वये कारवाई करण्याचे दिनांक २९/७/२०२३ रोजी आदेश निर्गमित करून, जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आरोपीं विरुद्ध कठोर कारवाईची पावले उचलण्यात आली आहेत.
गुन्ह्याची हकीकत येणेप्रमाणे: दिनांक २४-७-२०२३ रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यातील आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी यांनी जीवे मारण्याचे धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशातील पैसे काढून घेऊन व आरोपीतानी त्यांचे हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच आरोपी त्यांनी त्यांचे हातातील धारदार शस्त्राने इतर नागरिकांच्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केल्याने फिर्यादी यांनी दिलेला तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील मुख्य आरोपीवर गुन्ह्यातील टोळीचा सूत्रधार बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबीर बेहनवाल रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांनी त्याचे साथीदार १ ) नेम्या उर्फ रोशन रामदास पवार रा. प्लॉट नं. १८ बिल्डिंग नं. ८, निलगिरी बाग, औरंगाबादरोड, नाशिक, २) अमन सुरज वर्मा रा. वंदे मातरम अपार्टमेंट, औटे मळा, उपनगर, नाशिक रोड, नाशिक, ३) भय्यू उर्फ सत्यम संजीत ढेनवाल,रा. एकलहरा रोड, गेट नं. २, हनुमान नगर, नाशिक रोड, नाशिक, ४) रोहन राठोड उर्फ पियुश शैलेंद्र खोडे, रा. फर्नांडिस वाडी, नाशिक रोड, नाशिक, ५) सुधांशू उर्फ सोनू राजेश बेद रा. फर्नांडिस वाडी, नाशिक रोड, नाशिक, ६) मोहिज जावेद शेख रा. विठ्ठल मंदिराजवळ, विहितगाव, नाशिकरोड, नाशिक,व दोन पाहिजे असलेले आरोपी असे एकूण नऊ आरोपी, त्यांनी सोबत मिळून गुन्हेगारी टोळी निर्माण केली असून संघटित रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, गंगापूर इ. पोलीस ठाणे हद्दीतील लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगून धमकावून मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे, घरफोडी, चोरी, अनधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणी मागणी या प्रकारचे गुन्हर करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. टोळीप्रमुख मुख्य आरोपी बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबीर बेहनवाल यांनी गुन्हा करताना टोळीतील सदस्यांच्या साह्याने हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून, धाकदडपशा दाखवून आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व निर्माण करून, खंडणी वसूल करणे या प्रकारे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेले आहे. सदर टोळीतील सदस्यांविरुद्ध एकूण २५ गुन्हे उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, गंगापूर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेले आहेत. वरील गुन्ह्यातील टोळी प्रमुख व सदस्य यांनी नियोजित बद्ध कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांनी संघटितरित्या गुन्हा केला असल्याचे मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होण्याकरिता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३(१), ३ (१)(ग ),३ (२), ३( ४) ही वाढीव कलमे लावून मोक्का कायद्याअंतर्गत ठोस कारवाई केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नमूद सर्वांनी नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत केल्याने नाशिकचे शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोक्का कायद्यान्वये ठोस प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे. मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस ठाणे हद्दीत चौक सभा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत, तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांची माहिती घेऊन नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडविणाऱ्या इसमांवर मोक्का/एमपीडीए कायद्यांच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे, अशी माहिती नाशिक पोलीस विभाग यांचे कडून प्राप्त पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.