पो. डा. वार्ताहर : दिनांक १२/७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके , सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री कोयंडे , पो.हे.कॉ. 903 जामसंडेकर , पो.हे.कॉ 164 केसरकर , 655 इंगळे असे शासकीय गाडीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील वय 38 वर्षे, राहणार घर नंबर ७४, घाटवाडा पडोसे, सत्तरी नॉर्थ गोवा हा त्याच्याकडील कार नंबर जीए ०५ एफ ४६०१ ने प्रवास करताना मिळवून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत राऊंड काडतूस, 27 जिवंत काडतूस, पाच तलवारी, रोख रक्कम रुपये चार लाख 69 हजार ९५०, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, अकरा विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, 166 ग्रॅम 16 मिलि वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत रुपये नऊ लाख 68 हजार ९०, 5 किलो 300 ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने किंमत रुपये तीन लाख 35 हजार ८४४, पैसे मोजण्याची इलेक्ट्रिक मशीन, सोने-चांदी वितळवण्याची इलेक्ट्रिक मशीन, तीन ड्रिल मशीन, एक दुचाकी व एक चार चाकी वाहन असा एकूण 30 लाख 48 हजार 784 रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाणे बुरकर 174 / 23 कलम ३, २५, ४, २५, भारतीय शस्त्र अधिनियमन 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्या मार्फतीने सुरू आहे. आरोपी प्रकाश पाटील हा घरपोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ गुन्हे, गोवा राज्यात चार, कर्नाटक राज्य 24, असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत तसेच तो काही गुन्हांमध्ये पाहिजे व काही गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषित आहे. सदर आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली शस्त्र व घातक तलवारी कोयता चाकू सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र धाग, पोलीस उपनिरीक्षक श्री रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस अंमलदार राजेंद्र जाम संडेकर, केसरकर प्रकाश कदम, अनुप कुमार खंडे, आशिष गंगावणे ,रूपाली खानोलकर ,आशिष जामदार ,चंद्रकांत पालकर ,चंद्रहास नार्वेकर ,रवी इंगळे यांनी केलेली आहे.