पो. डा. क्राईम रिपोर्टर जिग्नेश जेठवा, नाशिक : वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरीची आकडेवारी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली आहे. २०२१ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ५३१ लाचखोरांची धरपकड करण्यात आली होती. सर्वाधिक १९२ लाचखोर नाशिकमध्ये अटक करण्यात आले असून, नाशिकने या वेळी पुणे विभागाला मागे सोडले आहे.
स्मार्टफोन क्लिअरन्स स्टोअर, 6299 रुपयांपासून सुरू
लाचखोरीची आकडेवारी
वर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३(जून)
सापळा ८७५ ८९१ ८६१ ६३० ७६४ ७२८ ४३९
बेहिशेबी मालमत्ता २२ २२ १९ १२ ०७ १२ ०५
भ्रष्टाचार २८ २३ ०५ २१ ०२ ०९ ०१
विभागानुसार
:सांख्यिकी विभाग गुन्हे आरोपी
नाशिक ९२ १३४
औरंगाबाद ७५ १०२
पुणे ७५ १०७
ठाणे ५५ ७८
अमरावती ४५ ६४
नागपूर ४४ ६६
नांदेड ३४ ३९
मुंबई १९ २२
लाचखोरीत अडकलेली पहिली पाच खाती
खाती प्रकरणे आरोपी रक्कम
महसूल १०७ १४७ १८,६८,०४०
पोलिस ७९ १०९ २६,१८,५००
पंचायत समिती ४५ ५९ ८,०१,३००
विद्युत कंपनी २२ ६६ १०,३७,३००
महापालिका २२ ३२ २३,१८,८००
महिन्यानुसार कारवाई
महिना सापळा आरोपी
जानेवारी – ५९ ८०
फेब्रुवारी – ७५ १११
मार्च- ८८ १२४
एप्रिल – ७० १००
मे – ६९ १००
जून – ७८ ९७
पंधरा लाचखोरांची दोषसिद्धी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १५ लाखाखोरांची दोषसिद्धी करण्यास यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक दोषसिद्धी झालेले तीन लाचखोर हे महसूल विभागातील असून, पोलिस, जिल्हा परिषद, वन विभाग, नगरविकास, आरोग्य, शिक्षण, विद्युत, परिवहन या विभागांतील प्रत्येकी एका लाचखोराचा समावेश आहे.