पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर :: ACB (लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले (Manjusha Bhosale as Deputy Superintendent of Police) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची (लाच मागणाऱ्या ) थेट तक्रार लाचलुचपत कार्यालयात करण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपला यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.