पो. डा. वार्ताहर संतोष नाईक , कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील समर्थ शिवारात मुंबई नागपूर महामार्गालगत असलेल्या गुरुराज एचपी पेट्रोल पंपावर गुरुवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील मॅनेजरवर दुचाकी वर आलेल्या तीन अज्ञात इस्मानी हल्ला केला असून या पेट्रोल पंपावरील मॅनेजर गुजरात बाबुराव घनगाव वय 40 , राहणार दहेगाव यांचा मृत्यू झाला आहे. पेट्रोल पंपावर वाद होण्यापूर्वी शेजारी असलेल्या हॉटेलवर या तिन्ही आरोपींचा वाद झाला असून त्यात एक जण गंभीरज कमी झाला असल्याचे समजते सदर घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात करीत झाली असून पोलीस सीसीटीव्ही द्वारे आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान पेट्रोल टाकण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये प्रथम दर्शनी दिसून येत असले तरी याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.