पो. डा. गुन्हे वार्ताहर , जिग्नेश जेठवा, नाशिक : दिनांक 26/6/2023 रोजी नाशिक येथे राहणारे शनि दयाल रामजी अमन बैग व त्याची पत्नी अशोकतीबाई आपल्या मुलाबाळांसह राहत होते. फिर्यादी शनि दयाल हे कामावर गेले असता व मुले वर खोलीत पिक्चर बघत असताना घरात कोणी नाही असे पाहून कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी कारणासाठी फिर्यादी यांची पत्नी अशक्ताबाई वय 29 हिचा सुरीने गळा चिरून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले होते. यावरून सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरं 188 / 2023 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय श्री प्रशांत बच्छाव (पोलीस उपायुक्त गुन्हे ) , माननीय श्री चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व सहायक पोलीस आयुक्त अंबड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकमी आजूबाजूच्या भागातील सर्व सीसीटीव्ही ची पाहणी करीत असता असे निष्पन्न झाले की, सदर घरामध्ये बाहेरून कोणीही व्यक्ती आत गेल्याचे दिसून आले नाही त्यामुळे त्या घरामधील वरच्या व खालच्या रूम मध्ये राहणारे व्यक्तींपैकी एकाने खून केला असावा या अनुषंगाने सदर रूम मधील एकूण 11 संशयित इसमांकडे श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग, श्री विजय ढमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा , श्री पंकज भालेराव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर व गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी अंमलदार सातपूर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सातत्याने सखोल कौशल्यपूर्ण चौकशी करीत असताना त्यांच्यापैकी एक इसमनामे जयकुमार , वय 26 राहणार गाव गिजिरी, तालुका जिल्हा उमरिया, मध्य प्रदेश यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मी व मयत आम्ही एकमेकांचे नातेवाईक असून आमचे मूळ गावाकडील शेत जमिनीच्या बांधावरून वाद असल्याचे सांगितले. मयत महिला घरात एकटी असताना तिला जमिनीबाबत विचारणा करता तिने वाद केल्याने घरातील चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली. यावरून खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने सदर आरोपीतास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, माननीय पोलीस उप आयुक्त श्री प्रशांत बच्छाव, माननीय पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक , नाशिक शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ , तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे , सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत गुन्हे शाखा , पोलीस उपनिरीक्षक वाघ व सातपूर गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी संयुक्तरीत्या केली आहे.