पो. डा. जिग्नेश जेठवा, क्राइम रिपोर्टर, नाशिक.
सविस्तर वृत्त असे कि, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पानटपऱ्या व इतर ठिकाणी प्रतिबंधित पानमसाला, गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे बाबत आदेशित केल्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांचे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना एक संशयित इसम प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) अवैध विक्री करण्याकरता वडाळागाव येथून इंदिरानगर येथे घेऊन जाणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती; त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्रीकरता इसम नामे १) मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर अन्सारी यांच्या ताब्यातील होंडा एक्टिवा मोपेड क्रमांक एम एच १५/ एचपी ३०४० वरील सापडलेल्या गोण्यांमध्ये विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, एम सेंटेड तंबाखू गोल्ड असा प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) किंमत रुपये 49 हजार 156 चा मिळून आला. सदरचा प्रतिबंधित पानमसाला त्याने संशयित क्रमांक २) मोहम्मद दिलशाद इस्लामामुद्दीन मलिक व आरोपी संशयीत क्र. ३- मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी रा. वडाळागाव, नाशिक यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले, त्यांचे कडे सदर मुद्देमालाबाबत चौकशी करता, त्यांचे राहते घरात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) किं. ₹.४ लाख 43 हजार 429 चा मिळून आला आहे, असा एकूण ४ लाख 92 हजार 585 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वर नमूद इसमांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) नाशिक शहर, श्री वसंत मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. चेतन श्रीवंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. देवाजी महाले, सर्व श्री. सुरेश माळोदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, रामदास भंडांगे, संदीप भांड, धनंजय शिंदे, मोतीराम चव्हाण, महेश साळुंखे, पोलीस शिपाई मुख्तार शेख, राहुल पालखेडे, गौरव खांडरे, चालक आण्णासाहेब गुंजाळ यांनी संयुक्तरीत्या केलेली आहे.