पो. डा. राजन चौक, शहर प्रतिनिधी, धुळे: दि.२३
सनी साळवे खून खटला निर्णायक टप्प्यावर आलेला असून तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांची आरोपी नंबर १ व २ यांच्या वकिलांनी घेतलेली उलटतपासणी पूर्ण झालेली असून दि.7 जुलै रोजी उर्वरित आरोपींचे वकील उपअधीक्षक सचिन हिरे यांची उलटतपासणी घेणार आहे.
सदर खून खटला न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांची बदली झाल्याने सदर खटल्याचे कामकाज न्या.डी.एम.आहेर यांचे समक्ष सुरू आहे.
देवपूरातील सशस्त्र हल्ल्यातून खून झालेल्या सनी साळवे खून प्रकरणी न्यायालयात तपास अधिकारी तत्कालिन उपअधीक्षक सचिन हिरे यांची आरोपी नंबर १ व २ यांच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणीचे दोन्ही सत्रात कामकाज चालले. त्यात सीसीटीव्ही फुटेजवर प्रश्न विचारलेत.
चंदन नगरातील सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात कामकाज सुरू आहे. सदर खून खटल्यातील काही आरोपी हे तुरुंगात आहेत. खटल्याचे पुढील कामकाज दि. 7 जुलै रोजी होणार आहे. याकामी विशेष सरकारी वकील शामकांत पाटील हे काम पहात असून ॲड.विशाल साळवे त्यांना मदत करत आहेत. सदर खून खटला ऐकण्यासाठी न्यायालयात तुडुंब गर्दी जमलेली होती. सदर खुन खटल्याकडे धुळे जिल्हा व महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष लागलेले आहे.