पो. डा. येवला,.२६ येवला शहर हे पर्यटन दृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय प्रसिद्ध शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने एरंडगाव येथे राखीव करण्यात आलेल्या जागेत रेशीम पार्क सुरू करण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रेशीम पार्क सुरू झाल्याने नवनवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांना आहे.
येवला एरंडगाव येथे रेशीमपार्क उभारण्याबाबत आज नाशिक येथील कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालय पुणेच्या सहायक संचालक डॉ.कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी श्री.इंगळे, श्री.सारंग सोरटे, गटविकास अधिकारी अन्सार शेख,दिलीप खैरे, वसंत पवार,शिवाजी खापरे, राहुल महाजन, केतन काढवे, वैभव भावसार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.