9 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : परीसरातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर, राजुरा, जिवती, वरोरा व चंद्रपूर या 9 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 9 सधन कुकुट विकास गटांची स्थापना करण्यासाठी सक्षमपणे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर योजना 50 टक्के शासन अनुदानावर राबवायची आहे. या योजनेत शासन निर्णयानुसार प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. हि योजना सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के शासन अनुदानावर असून एकूण प्रकल्पाची किंमत रुपये 10 लक्ष 27 हजार 500 इतकी असून 50 टक्के शासन अनुदान रु. 5 लक्ष 13 हजार 750 व 50 टक्के लाभार्थी हिस्सा रु. 5 लक्ष 13 हजार 750 असा आहे. सदर योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यामधून सक्षमपणे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांकडून दि. 9 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश हिरुडकर यांनी केले आहे.