Author: Police Diary

वाशिम, दि. 19 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन श्री. शिवाजी विद्यालय, मेन रोड, वाशिम येथे २४ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजतादरम्यान करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये वाशिम जिल्हयासह राज्यातील १३ पेक्षा जास्त नामांकीत उद्योगांचे उद्योजक/प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. ज्या रोजगार इच्छुक उमेदवाराची किमान इयत्ता १० वी, १२ वी, आय. टी. आय. (सर्व ट्रेड), पदवीधर (सर्व शाखा), पदव्युत्तर पदवी (सर्व शाखा), एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इत्यादी शैक्षणिक पात्रता असून 18…

Loading

Read More

मंदसौर (मध्य प्रदेश) दि. १८ जून २०२३ : “सत्तेसाठी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवून जातीधर्मात भेद निर्माण करणाऱ्याला कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल; प्रत्येक हाताला काम, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम, पायाभूत सुविधांसह गरीब-कल्याणकारी योजना वेगवान ही कार्यपद्धती अवलंबून भारताला नऊ वर्षात जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त करुन देणाऱ्या कर्तुत्वान विश्वगौरव, युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक ऊंची प्राप्त करुन देण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रत्येकाने  पुढे यायाला हवे” असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यपालन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले. “मोदी@9” अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार सुधीर गुप्ता, मध्य…

Loading

Read More

राजुरा (ता.प्र) :– विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करावे, यशस्वी व्हावे. आपले आईवडील, शिक्षक आणि समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी इन्फंट कॉन्व्हेंट राजुरा येथे सेवा कलश फाऊंडेशन राजुरा द्वारा आयोजित इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी सेवा कलश फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राजुरा शहरातील इयत्ता १० वी व १२ वी च्या एकूण ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत धोटे यांनी केले. सुत्रसंचालन…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी (मध्य प्रदेश)ता. १६ : विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावर भारताला प्रत्येक क्षेत्रात “नंबर वन” करण्यासाठी नवीनतम संकल्पनांसह अविश्रांत प्रयत्न सुरू केले आहेत; देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व बळकट करण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांची असून त्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन राज्याचे वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा येथे आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनात ते बोलत होते. खासदार सुधीर गुप्ता, आमदार अनिरुद्ध मारू, आमदार दिलीपसिंह परिहार, जिल्हाध्यक्ष पवन पाटीदार, संघटन सचिव क्षितिज भट आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ना.श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले…

Loading

Read More

चंद्रपूर : सध्या माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे सर्वदूर पसरत आहे. डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण भागात देखील माहितीची देवाणघेवाण होऊ लागली आहे. या निमित्ताने अनेक नोकरीच्या संधी मोठ्या शहरात उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपूर सारख्या दुर्गम असलेल्या शहरांमध्ये शिक्षण आणि नोकरी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने “याह” संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हब साकारण्यात येणार आहे. देशभरातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये चंद्रपूर शहरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या महत्त्वाच्या विषयावर संधी उपलब्ध नसल्याने इथल्या तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे अनेक अनुभव आजवर चंद्रपूरकरानी कथन केले आहे. युवकांना दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जायचे कि नाही या निर्णयाला एक पर्याय या निमित्ताने उपलब्ध व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, वाशिम,: सद्यःस्थितीत माध्यमांचे स्थित्यंतर मुद्रीत माध्यमांकडून समाज माध्यमांकडे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत प्रसारमाध्यमे यशकथा मांडून त्रुटी देखील निदर्शनास आणतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी माध्यमांची नैतिकता पाळून अशा योजनांच्या संदर्भात एक चेक एन्ड बॅलन्स ‘ व्यवस्था निर्माण करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगरागन एस. यांनी केले. आज 15 जून रोजी वाशिम येथे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या विषयावरील ‘वार्तालाप’ या एक दिवशीय माध्यम परिषदेचे उद्घाटन श्री. षण्मुगराजन यांनी केले. यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा परिषदेच्या…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, वाशिम: राज्य शासनाचा ‘ शासन आपल्या दारी ’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील 122 गावात हर घर दस्तक या अभियानाची सुरुवात नुकतीच करण्यात आली. या अभियानांतर्गत काटेपूर्णा अभयारण्याजवळ असलेल्या रुईया या गावात 12 कुटुंबापासून हर घर दस्तक अभियानाचा शुभारंभ झाला. रुईया हे गांव आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले गाव असून गावाची लोकसंख्या 35 ते 40 इतकी आहे. या गावात तालुक्यातून पोहोच रस्ता नसल्याने अभयारण्यातील रस्त्याचा वापर करून या गावात जावे लागते. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रुईया या गावातील प्रत्येक घरी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विविध योजनांचे 50 प्रकारचे लाभ देण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने 12 उत्पन्नाचे दाखले,…

Loading

Read More

पो डा. प्रतिनिधी, चंद्रपूर: गोसेखुर्द प्रकल्पाच्या आसोलामेंढा मुख्य कालव्यावरील येरगाव, खेडी, भेजगाव वितरीका व बाबराला, गडीसुर्ला, बेंबाळ चक, सावली क्र.9,10, 11,11(अ) या लघु कालव्यांचे बांधकाम करारनामा अन्वये मे.पी.व्येंकटा रमानाईया कंपनी हैदराबाद यांना प्रदान केले आहे. बंदनलिका वितरण प्रणालीने 4406 हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध करून 5776 हे. सिंचन क्षमता निर्मित करणे हे काम जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित होते. सदर कामाअंतर्गत उर्वरित सिंचन क्षमता निर्माण करून शेतकऱ्यांपर्यंत या हंगामात सिंचनासाठी पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते. याअंतर्गत कार्यक्षेत्रावर पाईप टाकण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये खोदकामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान कार्यक्षेत्रावर लागणाऱ्या विविध व्यासाच्या पाईपची पाईप फॅक्टरीमध्ये ऑर्डर देण्यात…

Loading

Read More

पो. डा, प्रतिनिधी, चंद्रपूर, :राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, आरसीएच अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, नोडल अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. संपदा ठाकरे, जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड.क्षमा बासरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुमंत पानगंटीवार उपस्थित होते.…

Loading

Read More

चंद्रपूर दि. १५ : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूर–चंद्रपूर मार्गावर तयार होत असताना आता गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपूरात होत आहे. शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा भर आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे दोन विद्यापीठांचे उपकेंद्र जिल्ह्याला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री.…

Loading

Read More