Author: Police Diary

वाशिम, दि. 20  : कृषी संशोधन केंद्र, वाशिम व कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी विभाग व इतर संलग्न विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेलगाव (घुगे) या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आदर्श गाव निर्मितीकरीता निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने 19 जून रोजी शेलगांव येथे खरीप हंगाम पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोलाचे कुलगुरु डॉ. शरदचंद्र गडाख, होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे, पंचायत समितीचे सभापती श्री. बालाजी वानखेडे, व सरपंच रत्नमाला घुगे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी विज्ञान केंद्र करडाचे…

Loading

Read More

वाशिम, दि. 20 :  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हयाकरीता विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ९५ तसेच बिजभांडवल योजनेअंतर्गत ९५ कर्ज प्रकरणे अशा एकुण १९० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता दिले आहे. विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त १० हजार रुपये रक्कम अनुदान स्वरुपात महामंडळामार्फत देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज म्हणून देण्यात येते. तसेच बिज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत २० टक्के रक्कम बिज भांडवल…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 20 : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 75 व्या वर्षात पदार्पणानिमित्त राज्य शासनाने 16 ऑगस्ट 2022 पासून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना म.रा. परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येते. गत वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यातील 75 वर्षांवरील 10 लक्ष 26 हजार 11 ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीने मोफत प्रवास केला आहे. आजही ‘लालपरी’ ही ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानली जाते. केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नव्हे तर शेवटच्या गावखेड्यापर्यंत एस.टी. महामंडळाची बस पोहचली असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसने प्रवास करीत असतात. महाराष्ट्र…

Loading

Read More

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आज आयोगाच्या कामकाजाचे सादरीकरण केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक – आर्थिक विकासासाठी आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने शेतकऱ्यांना फायदा होईल अशारितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत, अशा उपक्रमांसाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आपल्या जंगलांमध्ये आणि परिसरात वनौषधींची मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना देखील त्यांची माहिती आहे. या सर्व नैसर्गिक संपत्तीचे मूल्यवर्धन होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला…

Loading

Read More

परभणी, दि.२०: राज्य शासनाकडून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, ‘१०० दिवस दिव्यांगांसाठी’ ही विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाकडून एप्रिलपासूनच यशस्वीपणे सुरु आहे. आता दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ या हा उपक्रम राबविला जात असून, या विशेष मोहिमेतून आतापर्यंत तब्बल ५ हजार ८०० दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी येथे सांगितले. दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदिप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बन, मनपाचे उपायुक्त श्री. जगताप, गटविकास…

Loading

Read More

वाशिम, दि. 20  : खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम अंतर्गत सन 2023-24 या वर्षात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बॅकांमार्फत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मधकेंद्र योजनेअंतर्गत मधमाशा पालन प्रशिक्षण व साहित्य वाटप आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत प्रक्रीया व उत्पादन उद्योगाकरीता ५० हजार रुपये ते ५० लाख रुपयापर्यंत कर्ज प्रस्ताव ऑनलाईन करुन या कार्यालयामार्फत बॅकांना शिफारस करण्यात येते. यामध्ये मागासवर्ग, महिला, अल्पसंख्यांक व दिव्यांग व्यक्तीस मंजुर प्रकल्पाच्या ३५ टक्के ग्रामीण भाग व शहरी भागासाठी २५ टक्के अनुदान दिले…

Loading

Read More

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपुर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेती कामासाठी, ओझी वाहण्यासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी कालांतराने शेती व दुध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असल्याने या सर्व पशुधनाचा संगोपण करणे आवश्यक असल्याने शासनाने सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच यापूर्वी 26 एप्रिल 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये ज्या ३२ तालुक्यातील गोशाळांना अनुदान देण्यात आले आहे. ते तालुके वगळून…

Loading

Read More

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित चंद्रपुर, दि. 19 : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील 37 अधिकारी व कर्मचारी यांचे समावेशन,अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.त्यामध्ये चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तर 33 कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देणार आहेत.महापालिकेतील रित्त पदांबाबत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. चंद्रपूर महानगरपालिका येथील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मागील अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त आकृतीबंधातील 4 एकाकी पदावर सेवेत समावेशन करण्याबाबत तसेच उर्वरित 33 कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून…

Loading

Read More

नागपूर. पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांमध्ये मंगळवारी (ता.२०) मोदी@9 जनसंपर्क अभियान राबविण्यात आला. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी पूर्व नागपुरातील प्रभाग २६ मधील विश्वशांती नगर, माँ वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, गोकलानी लेआउट या परिसरामध्ये मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, भूपेश अंधारे, नारायणसिंह गौर, सचिन भगत, प्रदीप गोसावी, ज्योती वाघमारे, कल्पना सारवे, राकेश टोंग, प्रकाश जवादे, दीनकर चाफले, सलीम अंसारी, राम सामंत यांच्यासह अनेक नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदविला.

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 19 : संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो . व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय योगदिनाचा कार्यक्रम दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. योग दिनाच्या कार्यक्रमाकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पतंजली योग समिती चंद्रपूर, पतंजली योगपीठ…

Loading

Read More