Author: Police Diary

उपचारापोटी राज्य सरकारकडून 26 कोटी 61 लक्ष रुपयांचा लाभ चंद्रपूर, दि. 21 : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात गत वर्षभरात एकूण 12059 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांच्या उपचारापोटी राज्य शासनाकडून 26 कोटी 61 लक्ष 78 हजार 840 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. 1209 प्रकारच्या सर्जिकल व मेडीकल उपचाराच्या माध्यमातून शासकीय…

Loading

Read More

योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. योगामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होत असून योग हे एकप्रकारे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनशैलीसाठी रोज योगा करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. #आंतरराष्ट्रीययोगदिन च्या सर्वांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात योग पोहोचविला, त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात मांडला होता. योगाचे महत्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) मान्यता दिल्याने जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी हे सध्या न्यूयार्कमध्ये योगा करीत आहेत, ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.…

Loading

Read More

वाशिम दि.21 :  शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव दोनच्या वतीने मालेगाव तालुक्यातील बचत गटांच्या अतिगरीब 80 महिलांना अल्प व्याजदरातील तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून 8 लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या दारी जाऊन उपलब्ध करून देण्यात आले. 20 जून रोजी तहसील कार्यालय मालेगाव येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागाने नागरिकांना लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते.यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा परिविक्षाधीन तहसीलदार मिन्नू पी.एम.,तहसीलदार दीपक पुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव एक व…

Loading

Read More

शासन आपल्या दारी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वाशिम, दि. 21 : कारंजा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 20 जून रोजी महेश भवन येथे संपन्न झाली. सभेला जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया मोटघरे, उपाध्यक्ष प्रज्ञा मेश्राम, जमिलाबी नसीम, कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, व्यवस्थापक विजय वाहणे व श्री. खोडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. खडसे म्हणाले, ‘ शासन आपल्या दारी ’ हा शासनाचा महत्वाचा उपक्रम राज्यात सुरु आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.…

Loading

Read More

क्रीडा संकूलात जागतिक योग दिनाचे आयोजन चंद्रपूर, दि. 21 : धावपळीच्या जीवनात मनुष्याला निरोगी राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यावर मात करायची असेल तर दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा व नागरिकांनी निरोगी जीवन जगावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, पतंजली योग समितीचे शरद व्यास,…

Loading

Read More

नागपूर. पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक 26 येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बुधवारी 21 जून रोजी सकाळी प्रभागातील महालक्ष्मी सोसायटी येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. योग गुरू जयेश चव्हाण यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिकांचे धडे दिले. यावेळी वार्ड अध्यक्ष राजेश संगेवार, कार्यालय मंत्री सुधीर दुबे, बुथ अध्यक्ष रामचरण बेहनिया, लक्ष्मण राणा, राजेश राणा, केदार राणा, धनंजय राणा, प्रितम मस्करे, सचिन ओरोडीया, धर्मराज पराते, खुबलाल राणा, इंद्रेश्वर शिववंशी, दिपक भैसकर, मोंटू शर्मा, पवन शर्मा, निखिल नांदुरकर, गनेश टिपले, विरेन्द्र कुशवाहा, प्रज्वल भैसकर, पंकज राणा, अनिल राणा, लता बेहनिया, किरण राणा, जयन्ती राणा,…

Loading

Read More

चंद्रशेखर आजाद नगर, (जि.अलिराजपूर, मध्य प्रदेश) , दि. 20 जून 2023: भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतीकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या  चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आजाद यांच्या स्मारकातून मी प्रचंड ऊर्जा घेऊन परत जात आहे, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या अमर हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला सोमवारी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. ना.श्री सुधीर मुनगंटीवार सध्या मोदी@9 महासंपर्क अभियानासाठी मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदीवासी बहुल…

Loading

Read More

नागपूर, दि. 20 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आली. या संकल्पनेंतर्गत राज्यात 2 हजार 655 अमृत सरोवर निर्माण झाले आहे. या अमृत सरोवरां स्थळी बुधवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त, रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनो) सर्वसाधारण सभेत दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार २१ जून हा जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस…

Loading

Read More

वाशिम, दि. 20 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. वाशिम जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता थेट कर्ज योजनेचे ४० कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. थेट कर्ज योजनेअंतर्गत 1 लक्ष रुपयात महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये व ५ टक्के लाभार्थी सहभाग ५ हजार रुपये व उर्वरीत ८५ हजार रुपये महामंडळाचे कर्ज आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्हयातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदारांकडून मागविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत वितरीत केले जाणार आहे. वितरीत केलेले व परिपुर्ण असलेले अर्ज 1 ऑगस्ट 2023 पर्यंत स्विकारले जातील. जिल्हयातील मांग/मातंग समाजातील इच्छुक…

Loading

Read More

शिक्षणमहर्षी स्वर्गीय रामचंद्र सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भांडुप येथील नवजीवन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. माजी मंत्री डॉ.दीपक सावंत लिखित ‘गुलदस्ता’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर-उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल आणि त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण…

Loading

Read More