Author: Police Diary

वाशिम, दि. 22 : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी 29 जून 2023 पर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरीकांनी ऑनलाईन अर्ज करावे. या कालावधीत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येईल. 29 जूननंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.

Loading

Read More

हायड्रोक्सियुरीया औषधाच्या सेवनाने सिकलसेल रुग्णांचे जिवनमान सुधारते, वारंवार रुगणालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नाही, रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांसाठी हायड्रोक्सियुरीया वरदान असून या औषधाचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी सिकलसेल रुग्णांना देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सूर्योदया फेडरेशन यांच्या संयुक्त विदयमाने सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नुकताच इंदीरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय व सर्वेपचार रुग्णालय नागपूर येथे सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड उपस्थित होते. जागतिक सिकलसेल दिनाचे ग्लोबल स्ट्रेटीजी न्यूबॉर्न स्क्रीनींग या घोषवाक्य अंतर्गत शिबीराचे आयोजन…

Loading

Read More

जळगाव दि. २२ : राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिध्दी करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौर्‍याच्या पार्श्‍वभूमिवर, येणार्‍या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 27 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर येथील नियोजन भवनात पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 22 : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. शासकीय कामकाज करतांना विविध विभागाच्या फाईल्स अनेक दिवस प्रलंबित असतात. वेळेवर फाईल्सचा निपटारा होत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होतो. तसेच प्रशासनावर नागरिकांचाही रोष वाढतो. यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी 1 एप्रिल 2023 पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर अंमलबजावणी करीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 25 शासकीय कार्यालये…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूरच्या पुष्पा श्रावण पोडे यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंग बघेल, विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्ग, आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते. वर्ष 2023 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील…

Loading

Read More

माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांच्या उपोषणाला चंद्रपूरकरांच्या पाठिंबा पो.डा. प्रतिनिधी (चंद्रपूर) जितेंद्र मशारकर : चंद्रपूर शहरात सध्या अमृत योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी चे काम सुरु आहे. हे काम अद्याप पूर्णत्वास होण्याच्या अगोदरच कंत्राटी पद्धतीने पाणीपुरवठा योजना चालविण्याबाबत पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करण्याचे पाप मनपा प्रशासन करीत आहे. असा आरोप करीत माजी नगरसेवक गोपाल अमृतकर या निर्णयाविरोधात आज दिनांक २२-६-२०२३ रोजी महानगर पालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चंद्रपूरकरांनी पाठिंबा दर्शविला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा योजना कंत्राटदारामार्फत चालविण्यात आलेली होती. याचे अनुभव चंद्रपूरकरांना फार वाईट आलेले असून कित्येकदा पाण्याबाबत पालिकेवर मोर्चे आंदोलने काढल्या…

Loading

Read More

पो.डा. प्रतिनिधी (चंद्रपूर) जितेंद्र मशरकर : दिनांक २० व २१ जून २०२३ ला बंगाली प्रांतीय कॉलनी, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे नवीन श्री राम मंदिराची स्थापना करण्यात आली. दिनांक २० जून रोजी सकाळी मंदिर परिसरात भाविकांकडून भजन कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी श्री महाकाली मंदिरापासून श्रीरामांच्या नवीन मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भिवापूर प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते तसेच या मिरवणुकीत महिला व युवा वर्गाने मोठ्या संख्येत सहभागी झाले. ही मिरवणूक श्री महाकाली मातेच्या मंदिरापासून सुरू होऊन संपूर्ण भिवापूर वार्डातून मार्गक्रमण करीत, मिरवणुकीचा समारोप गंतव्यस्थानी म्हणजेच श्रीराम मंदिरात संपन्न झाला. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण बाळ राम, सीता,लक्ष्मण,उर्मिला,हनुमान यांचे स्वागत…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी मनकासे अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण,सरचिटणीस संतोषभाई धुरी यांच्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप,मागठाणे आगार येथील बेस्ट वाहन चालक कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारत प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या द्वार सभेला मनसे सरचिटणीस नयन कदम, विभाग अध्यक्ष विलास मोरे,मनकासे उपाध्यक्ष संदीप राणे , निलेश पाटील,दिनेश चव्हाण,बेस्ट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अमित चव्हाण,रुकेश गिरोला,उपविभागध्यक्ष प्रकाश घोसाळकर,संजय पाटील,शाखाध्यक्ष जतिन पवार,नरेंद्र पुरंदेकर,उपसचिव विवेक राऊत,चिटणीस वासुदेव नार्वेकर,शिल्पाताई सावंत,भाग्यश्री इंगळे,विद्या गायकवाड इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. लवकरच सर्व कामगारांच्या समस्या व्यवस्थापना पुढे मांडण्यात येतील याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी.

Loading

Read More

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त १९ जून ते १९ जुलै हा संपूर्ण महिना नाशिक शिवसेनेच्या वतीने भगवा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या *”हर घर सावरकर” संकल्पने अंतर्गत व उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेबयांच्या पुढाकाराने स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित *’सागरा प्राण तळमळला’ या नाट्यप्रयोगाचे विनामूल्य आयोजन रविवार दिनांक २५ जून रोजी दुपारी ३ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे करण्यात आले आहे. नाशिकचे सुपुत्र वि. दा. सावरकर व हिंदुत्व हे एक वेगळं नातं आहे. हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते,…

Loading

Read More

औरंगाबाद, दि 21 : वाळूज आणि चिकलठाणा ह्या औद्योगिक क्षेत्रासह डीएमआयसी आणि ऑरिक सिटीत विविध उत्पादने तयार होतात. या उत्पादनामध्ये वाढ करून जिल्ह्याची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी सर्व उद्योगसमूहाने प्रयत्न् करावे असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हास्तरीय निर्यात धोरण समितीच्या आढावा बैठकीत सांगितले. यावेळी आमदार प्रशांत बंब, पोलीस उपायुक्त अर्पणा गिते, निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, विजय चव्हाण, सतीश सोनी, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील विविध उद्योगाचे आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी या समितीच्या बैठकीत उपस्थित होते. औद्योगिक विकासासाठी रस्ते, वीज ,पाणीपुरवठा त्याचप्रमाणे कचऱ्याचे योग्य प्रकारे…

Loading

Read More