Author: Police Diary

पो. डा. जिग्नेश जेठवा, क्राइम रिपोर्टर, नाशिक. सविस्तर वृत्त असे कि, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पानटपऱ्या व इतर ठिकाणी प्रतिबंधित पानमसाला, गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे बाबत आदेशित केल्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांचे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना एक संशयित इसम प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) अवैध विक्री करण्याकरता वडाळागाव येथून इंदिरानगर येथे घेऊन जाणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती; त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्रीकरता इसम…

Loading

Read More

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Loading

Read More

आविसंचा मोठा मासा लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला पक्ष प्रवेश करत नेत्याने आणला अंतर्गत वाद चव्हाट्यावर पो. डा. वार्ताहर सिरोंचा: सिरोंचात आदिवासी विध्यार्थी संघटनेला जबरदस्त धक्का बसला आहे.आविसंचा मोठा मासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याने आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यात चांगली पकड निर्माण झाली होती. मात्र,काही महिन्यांपूर्वी माजी आमदार दीपक आत्राम यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचा झेंडा हाती घेतल्यावर आदिवासी विध्यार्थी संघटनेत फूट पडली.आदिवासी विध्यार्थी संघटना आणि भारत राष्ट्र समिती असे दोन गट निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न पडला. कोणत्या गटात जावे हेच कळत नसल्याने अंतर्गत राजकारणाला कंटाळून आदिवासी विध्यार्थी संघटना सोडत असल्याचे…

Loading

Read More

निशुल्क क्रमांक १८००-२३३४००० वर संपर्क करा पो. डा. वार्ताहर परभणी : राज्यातील शेतक-यांनी यंदा खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन करताना मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. कारण हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला असून, राज्यात सामान्यपणे २४ ते २५ जूनला पाऊस येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झालेले नाही. सद्यस्थितीत जून महिन्यात आतापर्यंत १३८.४० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात १६.४० मि.मी. (सरासरी…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर, दि. 23 : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ हा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या योजनेंतर्गत सौर उर्जेद्वारे वीज निर्माण करून शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी उद्योगांनासुध्दा माफक दरात वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी युध्दपातळीवर शासकीय / खाजगी जमीन शोधण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तहसीलदार तसेच विद्युत मंडळाच्या अभियंत्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेंतर्गत 0.5 ते 10 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कृषिप्रधान उपकेंद्रापासून…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , नागपूर : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने वीस टक्के जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत 2023-24 या वित्तीय वर्षात मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला, शेतकरी व बेरोजगारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा अनुसूचित जाती, नवबौध्द, अनुसूचित जमाती, विजाभज या प्रवर्गातील गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे. मागासवर्गीय शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युत मोटर पंप पुरविणे, मागासवर्गीय बेरोजगारांना मंडप डेकोरेशन पुरविणे आदी योजना राबविण्यात येत आहेत. योजनेसाठी अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा.

Loading

Read More

पो. डा.  वाशिम, दि. 23 : येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक मान्सूनचा पाऊस येण्यास अपेक्षेपेक्षा उशीर झाला आहे. हवामान विभागाच्या तज्ञानुसार २४ किंवा २५ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन अद्यापही झालेले नाही. सद्यस्थितीत जून महिन्यात आतापर्यंत १३८.४० मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात १६.४० मि.मी (सरासरीच्या ११ टक्के) पाऊस झालेला आहे. खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १५२.९७…

Loading

Read More

पो. डा.  परभणी, दि.२३ : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या वर्षांभरातील एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे अन्यथा मोटार वाहन कायदानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी केले आहे. शासकीय, निमशासकीय आस्थापना व कॉलेज प्रमुखांनी कार्यालय, आस्थापना आवारात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणाऱ्यास प्रतिबंध करावा. तसेच १९४ (ड) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोणातून कार्यालय, आस्थापनेतील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून किंवा अन्वये कुठल्याही पुराव्यासह विनाहेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या सर्व वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी दुचाकीवरून प्रवास…

Loading

Read More

पो. डा.  वार्ताहर , चंद्रपूर, ता. २३ : देशातील दोन निशान, दोन संविधान आणि दोन प्रधानाला विरोध करणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान सहजसोपे नव्हते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच आज काश्मिर भारतात आहे. त्यामुळे त्यांचा त्याग व बलिदान कधीही विस्मरणात जाऊच शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन (बलिदान दिनानिमित्त ) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भाजपा महामंत्री ब्रिजभूषण…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर:  1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम 1 जून ते 16 ऑक्टोबर या कालावधीकरीता जाहीर झालेला आहे. 17 ऑक्टोबर  रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे व अंतिम प्रसिध्दी 05 जानेवारी 2024 रोजी करावयाची आहे त्याकरिता दावे, हरकती दाखल करावयाचा कालावधी 17 ऑक्टोबर  ते 30 नोव्हेंबर असा असणार आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार नोंदणी करतेवेळी कागदपत्रासह आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. नागरिकांच्या सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने…

Loading

Read More