Author: Police Diary

पो. डा. वार्ताहर : आज दिनांक २९ जून २०२३ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथील रुख्मिणी पांडुरंग संस्थान येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी बुलढाणा नगरपालिकेच्या मा.नगराध्यक्ष सौ पुजाताई संजय गायकवाड तसेच युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते विठुरायाची मनोभावे पूजा करण्यात आली तसेच मतदार संघातील तसेच महाराष्ट्रातील बळीराजा सुखी व्हावा यासाठी, विठुरायाला पाण्यासाठी साकडे घालवण्यात आले,यावेळी सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, बाळासाहेब नारखेडे, नामदेवराव पाटील, सुरेश खर्चे, तेजराव शिंबरे, बंडू पाटील, एकनाथ राठोड, राजू पाटील, गजानन चव्हाण, गणेश पाटील, प्रवीण निमकर्डे,सचिन हिरोळे,विश्वंभर लांजुळकर,…

Loading

Read More

9 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन पो. डा. वार्ताहर  चंद्रपूर : परीसरातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर, राजुरा, जिवती, वरोरा व चंद्रपूर या 9 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 9 सधन कुकुट विकास गटांची स्थापना करण्यासाठी सक्षमपणे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजना 50 टक्के शासन अनुदानावर राबवायची आहे. या योजनेत शासन निर्णयानुसार प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. हि योजना सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के शासन अनुदानावर असून एकूण प्रकल्पाची किंमत रुपये 10 लक्ष 27 हजार 500 इतकी असून 50 टक्के शासन अनुदान रु. 5 लक्ष 13 हजार…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  पंढरपूर : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिरे सुरु आहे. मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दुपारी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  पंढरपूर : पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी स्वच्छता दिंडी समारोप समारंभात व्यक्त केला. गेल्या १७ वर्षापासून काढण्यात येणाऱ्या स्वच्छता दिंडी उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वच्छभारत अभियान सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्यारितीने झाले आहे. पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि…

Loading

Read More

 पो. डा. गुन्हे वार्ताहर , जिग्नेश जेठवा, नाशिक  : नाशिक शहरात वारंवार घडणारे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी स्वतः सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली शाखा युनिट एकचे पथक घरफोडी करणाऱ्या आरोपी त्यांची माहिती काढून शोध घेत होते. दिनांक 25 जून 2023 रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना अंमलदार राजेश राठोड यांना घरफोडी चोरी करणारा इसम बिटको चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व व पोलीस अंमलदार…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर #पंढरपूर  : आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. या वारकरी भाविकांचे मुख्यमंत्री या नात्याने स्वागत करतो. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला, हे आपले भाग्य आहे, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे म्हणाले. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर #पंढरपूर  : “बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यावरची सगळी संकटं, आरिष्ट दूर होऊ दे, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व समाजघटक सुखी, समाधानी झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे” अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूराया चरणी केली. यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. श्री. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या…

Loading

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ पो. डा. वार्ताहर चंद्रपूर, दि. 28: केंद्र शासनामार्फत सन-2022 पासून नॅनो युरीया व यावर्षीपासून नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढविण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरीता ईफको या सहकार क्षेत्रातील कंपनीद्वारे नॅनो युरीया व नॅनो डीएपी या विद्राव्य खतांचा वापर वाढावा, यासाठी रथाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या प्रचार व प्रसिद्धी रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरल्यास पारंपारीक खताएवढेच फायदे होणार असून ही खते पारंपारीक खतांच्या तुलनेने स्वस्त असल्याने…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पाठयपुस्तकापासून वंचित राहु नये, पाठयपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येवु नये, तसेच शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणणे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 करीता एकात्मिक मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे. सन 2023-24 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरीता 1 लक्ष 73 हजार 290 विद्यार्थ्यांकरीता 7 लक्ष 19 हजार 638 पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार,…

Loading

Read More

एकाच कामासाठी एकाच वेळी 3 कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा घाट घातला पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी आडमार्गाने पाणीपुरवठ्याच्या कामाचे खाजगीकरण करण्याचे कट कारस्थान रचले असल्याचा आरोप (भाजप वगळून) मनपाच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केलेला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजून पर्यंत याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र इतर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पाणीपुरवठ्याच्या कंत्राटाबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला. पाणीपुरवठ्याच्या एकाच कामासाठी एकाच वेळी 3 कंत्राट देण्याचा मनपाचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस चे दिपक जयस्वाल, विनोद लभाने,काँग्रेस चे…

Loading

Read More