Author: Police Diary

मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह चार जणांचा समावेश पो.डा. वार्ताहर , नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा, पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , पुणे : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सीडन्स…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , पुणे : आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊनही तरुण पिढीला जर्मनी, जपान सारख्या देशात जाण्याची संधी मिळू शकते. अशा संधींचा लाभ घेऊन करिअर घडवावे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन दुरदृष्य प्रणालीद्वारे श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, औंध आयटीआयचे उपसंचालक तथा पुणे विभागाचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक आर. बी. भावसार, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या…

Loading

Read More

अद्ययावत सोयी सुविधांसह नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याचे ना. मुनगंटीवार यांचे निर्देश पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : बल्लारपूर येथे निर्माणाधीन असलेल्या स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहाच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि.२०) पाहणी केली. अद्ययावत सोयी सुविधांसह नियोजित वेळेत सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले. स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र ठरणार आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये याचा समावेश होत असून सध्या प्रगतीपथावर काम सुरू आहे. या कामाची पाहणी करतांना…

Loading

Read More

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा पो.डा. वार्ताहर , नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष आहे. कळमना मार्केट मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर आजवर भर दिला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर : कोकणातल्या देवगडच्या हापूस आंब्यापासून ते थेट गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टा गावच्या ‘गोला’ या देशी आंब्यापर्यंत, खान्देशच्या ज्वारीच्या लाह्यापासून वर्धा नागपूर जिल्ह्यातील केसर, दशेरी ते सफेदापर्यंतची वैविधता ही ‘आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे’ वैशिष्टय ठरले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने येथील कुसूमताई वानखेडे भवन येथे दिनांक 16 पासून सुरू झालेल्या आंबा मिलेट धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गडचिरोलीच्या जीवनगट्टा गावातील कृषी पदवी संपादन करणाऱ्या प्रणाली गावडे हिने आपल्या कौशल्यावर वैविध्यपूर्ण आंबाडी, टोमॅटो, लसून लोणच्यासह गावातील देशी गोला आंब्याला हापूसच्या रांगेत आत्मविश्वासाने बसविले आहे. “माझ्या गावची मी पहिलीच महिला कृषी पदविधारक होत आहे.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा घेतांना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते. 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून…

Loading

Read More

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पद्माकर पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ए.ए. तांदळे, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रत्येक विभागाने व्हिजिलन्स (सतर्कता) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. भ्रष्टाचाराशी संबंधित प्राप्त तक्रारी किती व किती तक्रारींचा निपटारा झाला, याबाबत अहवाल सादर करावा. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 ते 2024 या कालावधीत अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामाकरीता 15 ते 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. जिल्ह्यात 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडली असल्याने ती पूर्ण करण्याकरीता 31 मे पर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. याकरीता गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियंता, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशा जवळपास 100 हून जास्त अधिकारी – कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अर्धवट घरकुलांची संख्या अधिक असल्याने बांधकाम पूर्ण करण्याबाबत शासनाकडून सुचना प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी खातेप्रमुखांनी ग्रामपंचायतींना भेट देऊन घरकुलांच्या बांधकामाची…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, बुलडाणा : कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रदर्शनी आज उद्घाटन केले. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रोडवरील कृषि विज्ञान केंद्रात शुक्रवार, दि. १७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्री पार पडली. या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते. तसेच आंब्यावर…

Loading

Read More