- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई – भूमिपूजन करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की – ✅ सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार आहे. ✅ गेल्या एक वर्षाच्या काळात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. ✅ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान. ✅ महिलांना एस. टी प्रवासात ५० टक्के सवलत, ✅ केंद्राच्या किसन सन्मान…
‘हर घर जल’अंतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दि. 30 (जिमाका) केंद्र सरकारने ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. गंगापुर तालुक्यात देखील ‘हर घर जल’ व्दारे 373 गावांमध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे. 1 हजार कोटी रुपयांची ही योजना मंजूर झाली असून आता प्रत्येक घराला केवळ 10 पैशात एक लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गंगापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत 373 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,…
पो. डा. वार्ताहर , वाशिम : कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्यांना आज 30 जून रोजी विद्याभारती महाविद्यालय, कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात लोकसहभागातून बी-बियाणे व खत वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, तहलिसदार कुणाल झाल्टे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड, तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, कृषी व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष विनोद राऊत, डॉक्टरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय कांत, माजी नगराध्यक्ष संजय काकडे व श्रीकांत लव्हाळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते 107 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना बी-बियाणे व खत किटचे वाटप करण्यात आले. लोकसहभागातून बियाणे व खत वाटप करण्याकरीता डॉक्टर्स…
पो. डा. वार्ताहर वाशिम : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण ह्या 3 व 4 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील महिलाविषयक प्रकरणांचा आढावा आयोजित सभेत घेतील. या सभेला महिलांच्या प्रश्नांशी संबंधित असलेले विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. यामध्ये डीव्ही केसेस, तक्रार निवारण समिती, बेपत्ता असलेली बालके, बालविवाह, भरोसा सेल, निर्भया पथक, सखी वन स्टॉप सेंटर, महिलाविषयक योजनांची माहिती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, महिला ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्र, तृतीयपंथीयांच्या योजना, हिरकणी कक्ष, बस स्टँडवर महिला वाहकांसाठी चेंजिंग रूम, बस स्टॅन्डवरील महिलांची सुरक्षितता व शौचालय आणि…
पो. डा. वार्ताहर वाशिम : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात 28 जून रोजी सांसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने मराठा समाजाकरीता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनेची माहिती घेतली. तसेच या योजनेची कार्यपध्दी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचेकडून संगणकासमोर बसून घेतली. यावेळी श्री. पाटील यांनी राज्यातील 4 हजार 333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लक्ष रुपये व्याज परताव्याची रक्कम स्वत: लाभार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन वितरीत केली. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. पाटील यांनी एलओआय निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज…
पो. डा. वार्ताहर , नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 3 जुलैला दुपारी 1 ते 2 या वेळेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनासाठी नागरिकांकडून दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेला नागरिकाला व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल. लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर कारवाई न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य राहील. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे…
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर, : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता…
पो. डा. वार्ताहर , नागपूर : सिकलसेल नियंत्रणासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय सिकलसेल मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहीमेंतर्गत जिल्हास्तरीय मोहिमेची सुरुवात उद्या, दि. 1 जुलैपासून होणार आहे. सिकलसेल मोहिमेअंतर्गत तरुणांमध्ये सिकलसेल विषयी जनजागृती तसेच सिकलसेल तपासणी, कार्ड वितरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे. तरुणांमध्ये सिकलसेल विषयी जागृती व्हावी तसेच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळावे या अनुषंगाने राष्ट्रीय सिकलसेल मिशन देशभरात राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशपातळीवर या मिशनचे उद्घाटन करणार आहेत. सिकलसेल तपासणी मोहिमेची सुरुवात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हास्तरावरील सर्व आरोग्य संस्थेवरून लोकप्रतिनिधी अधिकारी, कर्मचारी ऑनलाईन…
पो. डा. वार्ताहर : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहे. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवाडा…
पो. डा. वार्ताहर , वढोली: आज पासून जिल्हा परिषद शाळेची घंटा वाजली असून नवागत विध्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम गोंडपिपरी तालुक्यात सर्व शाळेत उत्साहात पार पडले. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी.हा उदात्त हेतू ठेऊन सामाजिक भावनेतून वढोली जी प शाळेत शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या पुढाकारातून नोट बुक वितरित करण्यात आले.यावेळी मित्रपरिवार व बाजारसमिती संचालक संदीप पौरकार,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रुपेश कोहपरे,रुचीगंगा संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के, गोकुल सोनटक्के,उमेश उपासे,निखिल आत्राम,सुरज शेंडे,महेश झाडे,सुरज भोयर उपस्थित होते