Author: Police Diary

पो. डा. वार्ताहर : देशात समान नागरी कायदा तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. संसदेच्या कायदा आणि न्याय विभागाच्या संयुक्त समितीची बैठक आज पार पाडली. तर, दुसरीकडे कायदा आयोगाने समान नागरी कायद्याचा मसुदा (Uniform Civil Code Draft) तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाकडे समान नागरी कायद्यासाठी (Uniform Civil Code) जवळपास 9.5 लाख सूचना, मते आली. यातील बहुतांशी सूचना या कायद्याच्या समर्थनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समान नागरी कायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, एकापेक्षा अधिक विवाह करण्यास पूर्ण बंदी असणार आहे. त्याशिवाय, मुस्लिम धर्मातील इद्दत आणि हलाला सारख्या प्रथांना बंदी घालण्यात येणार आहे. वारसदारांमध्येही मुलगा आणि…

Loading

Read More

पो. डा. जिग्नेश जेठवा, क्राईम रिपोर्टर, नाशिक: हरियाणा सोनिपथ येथून कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आलेल्या सहा तलवारींचे पार्सल अंबड पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात केली. याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. अंबड पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरियाणा सोनीपथ येथून कोपरगाव येथे सहा तलवारींचे पार्सल येणार असून हे पार्सल प्रथम नाशिक अंबड एमआयडीसी वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात येणार आहे. तेथून ते पार्सल कोपरगाव येथे जाणार असल्याचा गुप्त संदेश अंबड पोलिसांना मिळाला. त्यानुसार अंबड पोलीस…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथा पालथ होत असताना आता पर्यंत ठिक होते, पण आता आपला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष रडारवर आला आहे. अशा अत्यंत नाजूक वेळी प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. सत्तेतील भाजपा पक्षाला फाट्यावर मारुन मुदत पूर्व आमदारकीचा राजीनामा देवून बाहेर पडलो होतो. आपल्याच सहकार्‍यांविरुध्द कट कारस्थाने करणे , चुकून सुध्दा खरे न बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, भ्रष्टाचार तर पाचविला पूजलेला ! मी नाही त्यातली , कडी लावा आतली असे प्रतंतर अनेकवेळा पाहिले. प्रत्यक्षात मात्र उक्ती आणि कृती यात जमिन आकाशाचे अंतर असतांनाही तेवढ्याच निर्लज्जपणे केल्या जाणार्‍या वर्तणुकीचा अक्षरशः उबग आला होता. त्यातल्या…

Loading

Read More

पो. डा. क्राईम रिपोर्टर जिग्नेश जेठवा, नाशिक : वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरीची आकडेवारी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली आहे. २०२१ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत ५३१ लाचखोरांची धरपकड करण्यात आली होती. सर्वाधिक १९२ लाचखोर नाशिकमध्ये अटक करण्यात आले असून, नाशिकने या वेळी पुणे विभागाला मागे सोडले आहे. स्मार्टफोन क्लिअरन्स स्टोअर, 6299 रुपयांपासून सुरू लाचखोरीची आकडेवारी वर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३(जून) सापळा ८७५ ८९१ ८६१ ६३० ७६४ ७२८ ४३९ बेहिशेबी मालमत्ता २२ २२ १९ १२ ०७ १२ ०५ भ्रष्टाचार २८ २३ ०५…

Loading

Read More

आपण आपली अपॉइंटमेंटस् कळवा. आपल्याला योग्य माहिती दिली जाईल कोणत्याही परिस्थितीत बळजबरी, जबरदस्ती, दिशाभूल करून अवाच्या सव्वा प्रीमियम आकारला जाणार नाही मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे. मेडिक्लेम म्हणजे काय ? १) अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा २) अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा ३) २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो. मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात. १) खोलीभडे २)…

Loading

Read More

प्रिय लेशपाल आणि हर्षद, मित्रानो खूप खूप अभिनंदन!!💐💐👌👌 दिल्ली मध्ये तरूणीवर सपासप वार होत असताना अगदी निर्लज्ज तटस्थपणे लोक पहात जात होते.एक समाज म्हणून सोडाच, पण एक माणूस म्हणून तरी आपण जिवंत आहोत का ? हा प्रश्न पडावा इतक्या मुर्दाडपणाचे ते कृत्य होते.भविष्यात मुलीबाळींवर अगदी दिवसाढवळ्या कांही संकट आले तरी देवच वाली अशी परिस्थिती सर्वसामान्य पालकांना वाटू लागली होती.. तसाच प्रयत्न ईथे झाला आणि या महाराष्ट्राच वेगळेपण तुम्ही दाखवून दिले. मनात सूडाचे विकृत विचार आणि हातात कोयत्या सारखे घातक हत्यार असणाऱ्या त्या नराधमास स्वतः निशस्त्र असताना कोणताही वेळ न दवडता हिमतीने भिडलात आणि त्या मुलीचे प्राण वाचवले.महाराष्ट्राचे वेगळेपण सगळ्या देशाला…

Loading

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते 5 जुलैला विद्युत रोषणाईचे लोकार्पण पो. डा. वार्ताहर चंद्रपूर : चंद्रपूर येथील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळणार आहे. येत्या बुधवारी (दि. 5 जुलै) सायंकाळी 6 वाजता राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते केबलस्टे पुलावरील या दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण होणार आहे. चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवरील पूल आता विद्युत रोषणाईने झळाळणारा देशातील तिसरा पूल असेल. देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असलेला पूल आपल्या जिल्ह्यात असणार आहे, याचा अभिमान असल्याची भावना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि पणजीच्या (गोवा) धरतीवर हा रामसेतू उभारण्यात आला आहे.…

Loading

Read More

आम नदी काठावरील गावांमध्ये शुक्रवारी गावफेरीचे आयोजन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी होणार सहभागी पो. डा. वार्ताहर , नागपूर : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत आम नदी काठावरील गावांमध्ये शुक्रवारी प्रदूषणाला रोखण्यासाठी जनजागृतीविषयक गावफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी हा जनजागृतीपर कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, सहायक वनसंरक्षक हरवीर सिंह, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन हटवार, राज्यस्तरीय सदस्य प्रवीण महाजन, नाग नदी…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर, वाशिम : महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयाअंतर्गत महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ व गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात याव्यात. महिलांना न्याय मिळवून देण्यास ह्या समित्या उपयुक्त आहे. सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे. असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी केले. आज 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयातील महिलाविषयक प्रकरणांचा आढावा घेतांना ॲड. श्रीमती चव्हाण बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Read More