- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो. डा. वार्ताहर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया, असे आवाहन आदरणीय शरद पवार साहेबांनी बैठकीत कार्यकर्त्यांना केले. उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! अशी साद त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घातली. सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्याकडे ज्या खुर्च्या रिकाम्या झाल्यात त्यावर नवीन लोकांना बसण्याची…
पो. डा. वार्ताहर ,वाशिम : आदिवासी मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.वसतीगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.इयत्ता ११ वी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. ऑनलाईन अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. जिल्हयात आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्रमांक १, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक 1, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक 2, माउली कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह…
पो. डा. वार्ताहर परभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून, 2023 पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 11 जुलै, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात…
पो. डा. वार्ताहर , वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर ३ महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी यापुर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकुन १ एप्रिल २०23 ते 30 जून २०23 या तिमाही कालावधीचे (आस्थापनाच्या हजेरी पत्रकाच्या कर्मचारी संख्येनुसार) ई-आर-१ माहे, जुलै २०23 अखेरपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. ई-आर-१ भरण्यासाठी http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन एम्पलॉयमेंट या टॅबमध्ये एम्पलॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती प्रोफाईल तात्काळ अद्यावत करावी. ३१ मार्च, ३० जुन, ३० सप्टेंबर…
पो. डा. वार्ताहर, वाशिम : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण हया 3 जुलै रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी वाशिम जिल्हा कारागृह, समाज कल्याणचे मुलींचे वसतीगृह आणि आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. जिल्हा कारागृहाच्या भेटीप्रसंगी ॲड.श्रीमती चव्हाण यांचे कारागृह अधिक्षक प्रदीप इंगळे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी कारागृहाचे जेलर गिरीधर गिरासे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी ए.एल.आगासे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ॲड.श्रीमती चव्हाण यांनी कारागृहातील महिला विभागाला भेट देवून महिला बंदयाशी चर्चा करून आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस केली. कोणत्या घटनेमुळे आपणाला तुरुंगवास भोगावा लागत आहे, याची माहिती त्यांनी महिला बंदयाकडून घेतली. तुरुंगात मिळणारे भोजन, नास्ता, स्वच्छता व…
पो. डा. वार्ताहर , पुणे : नुकत्याच पुण्यात घडलेल्या मुलीवरील हल्ल्याप्रकरणी ज्या तरूणांनी जीवावर उदार होऊन त्या मुलीचे प्राण वाचवले असे हर्षद पाटील व लेशपाल जवळगे यांचा सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक राजसाहेबांनी केले व भविष्यात कोणत्याही मदतीस उपलब्ध आहे असे आश्वासित केले. त्याचप्रमाणे अमितसाहेब ठाकरे यांनी देखील या तरूणांचा चिंचवड येथे सन्मान केला. सन्मा.राजसाहेब ठाकरे यांना भेटण्याचे स्वप्न यानिम्मित्ताने पूर्ण झाले व त्यांनी मायेने गालावरून जो हात फिरवला तो आयुष्यभर लक्षात राहिल असे या तरूणांनी सांगितले . मनसेचे नेते अनिल शिदोरे , राजेंद्र वागस्कर शहर अध्यक्ष साईनाथ…
राष्ट्रपतींच्या हस्ते कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित पो. डा. वार्ताहर , नागपूर: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या, दि. 5 जुलै रोजी दुपारी कोराडीतील भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची सचित्र माहिती या केंद्रात दर्शकांना मिळणार आहे. लोकार्पण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोराडी येथे भारतीय विद्या भवनातर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या माळ्यावरील दालनात चित्र…
गडचिरोलीत पदवीदान समारंभ तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण नागपुरात प्रथम आगमन,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत पो. डा. वार्ताहर , नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले.५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या…
पो. डा. वार्ताहर : धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पो. डा. वार्ताहर, पळासनेर : गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रक ने भरधाव वेगात एका वाहनाला चिरडत एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सदरील अपघातातील जखमींपैकी 8 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा…