Author: Police Diary

बोर्डा येथे होणार नवीन तलाठी कार्यालय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर, : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 30 लक्ष आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी 30 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे . त्यासोबतच, शासकीय कार्यालयीन इमारत बांधकाम  बाब 53-मोठी बांधकामे या शिर्षा खाली, बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबत या भागातील…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आद.खा.शरदचंद्र पवार यांची “सिल्व्हर ओक” निवासस्थानी भेट घेवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकसंघपणे आपल्या आणि राष्ट्रवादी पक्षासोबत असल्याची माहिती पवारसाहेबांना दिली.पवार साहेबांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकसंघपणे पक्षाच्या पाठीशी असल्याबाबत त्यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाल्याबाबत आम्हाला चर्चे दरम्यान सांगितले,आणि या एकजुटी आणि पाठिंब्याबद्दल आम्हा सर्वांचे मा.शरद पवारांनी “अभिनंदन” केले. या प्रसंगी जिल्ह्यात पाऊस, पिकांची, पेरण्यांची परिस्थिती कशी आहे अशी मोठ्या आस्थेने चौकशी केली. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,हिराचंद बोरकुटे,अरुण निमजे, जयंत टेमुर्डे,बादल उराडे,संजय वैद्य,राजेंद्र आखरे,आल्हाद बहादे,पंकज…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर ,गडचिरोली :  मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृह आणि निवासी शाळांचे लोकार्पण करण्यात आले. गडचिरोली येथे मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह आणि गडचिरोलीती मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेचे लोकार्पण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयूचे आणि पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  , चंद्रपूर : घुग्घूस येथील जामा मस्जिद समोर असलेल्या अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउस व येथीलच कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जळलेल्या दुकानांची पाहणी करुन आगी मागचे कारणाची माहिती घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूस युवा नेते इमरान खान, स्वप्नील वाढई, नागेश तुराणकर, राजू नातर, राजू सूर्यवंशी, आकाश चिलका, मयूर कलवल, विक्की सोदारी, भोंगडे आदींची उपस्थिती होती. मंगळवारी रात्रोच्या सुमारास अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउुस व येथीलच कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. काही तासाच्या परिश्रमा नंतर सदर आगीवर नियत्रंण मिळविण्यात आले.…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  : राज्य विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर  , चंद्रपूर : नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, भूषण येरगुडे, शाखा अभियंता श्रीकांत भट्टड, राखी कंचर्लावार, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरात…

Loading

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ प्रवास्यांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवासी बसेच्या सुरक्षतेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतुक बसेसची फिटनेस तपासणी करुन वाहण आणि वाहकांचीही शारीरीक व मानसीक तपासणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना केल्या आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, सहायक परिवहण अधिकारी आंनद मेश्राम, सहायक मोटर वाहण निरीक्षक अमित काळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष सलिम शेख, युवा नेते अमोल शेंडे,…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , औरंगाबाद  : सामान्य प्रशासन विभागाअतंर्गत माहिती व जनसंपर्क महसंचालनालयातील वर्ग 1 संवर्गातील अधिकारी यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. मिलिंद मधुकर दुसाने यांची बदली करण्यात आली आहे. आज त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी औरंगाबाद या पदाचा कार्यभार स्वीकारला .तसेच मुकुंद चिलवंत यांची बदली जिल्हा माहिती अधिकारी सिधुदुर्ग येथे झाली असल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालय, संचालक माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या वतीने निरोप देण्यात आला. मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालक किशोर गांगुर्डे…

Loading

Read More

परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही : ना. सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वे प्रशासनाला तंबी पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर :- रेल्वे लाईनच्या परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना कोणतीही सुचना न देता रेल्वे प्रशासन दडपशाही करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार धावून आले, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय एकाही घराला हात लावायचा नाही, अशी तंबी त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिली आहे. नियोजन भवन येथे रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांच्या समस्यांवर आयोजित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाची दादागिरी खपवून घेणार नाही, असेही स्पष्ट बजावले. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव…

Loading

Read More

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेले सांस्कृतिक केंद्र भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ जीवनमुल्यांचा परिचय करून देण्यात महत्वाची भूमिका बजावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय विद्याभवन संस्थेचे पदाधिकारी जगदीश लखाणी,…

Loading

Read More