- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो. डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने आयोजित ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २७ जुलै २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघ व खेळाडूंची १४ व १७ वर्ष अशा दोन वयोगटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. १४ वर्षाखालील मुलांकरीता वय १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्ष वयोगटात मुले व मुलींकरीता १ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असावे. ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा १४ ते २३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली व बंगलोर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना जिल्हास्तर स्पर्धेपुर्वीच www.subrotocup.in…
पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे “आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम” यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त “मा.सुनिल भाऊ दहेगांवकर” यांच्या नेतृत्वात सर्किट हाऊस येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडून, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर पो. स्टे कोठारी अंतर्गत जनता विद्यालय येथे सकाळी 9.30 वाजता अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला तसेच कोठारी गावा मधून रॅली कडून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमास विद्यार्थी व सर्व शिक्षक हजर होते.. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनापासून परावृत राहण्यास सपोनि गायकवाढ, पोहवा मुजावर अली व पोहवा तोटेवाड यांनी मार्गदर्शन केले..
पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : चंद्रपूर येथील भर वस्तीच्या भागात विद्या विहार शाळेजवळ, छत्रपती नगर येथील रहिवासी प्रेमदास मारोती रामटेके वय ७२ यांच्यावर अस्वलीने जीवघेणा हल्ला केला, नित्य नियमाने रोज मॉर्निंग वॉक ला प्रेमदास मारोती रामटेके सकाळी ४:३० ला एकटेच निघाले, पावसाळा असल्याने सोबत छत्री होती, विद्या विहार शाळेजवळ वॉटर ट्रीटमेंट प्लांट च्या रस्त्यानी जात असतांना त्यांना अस्वल येतांना दिसली,अचानक अस्वलीने काही कळायच्या आत प्रेमदास रामटेके वर हल्ला चढवला तो हल्ला रामटेकेंनी छत्री मारून परतवला पण सोबत असलेल्या दुसरी अस्वलीने डोक्यावरती हल्ला करून गंभीर जखमी केले,त्या हल्ल्यात ते जमिनीवर पडले,पण रामटेकेंनी पुन्हा छत्रीने अस्वलीला मारले व ती अस्वल पळून गेली,…
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले कौतुक. पो. डा. वार्ताहर, राजुरा (ता. प्र) :– राजुरा येथील भारत चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोशन प्रकाश हावडा यांनी नुकतीच चार्टर्ड अकाऊंटंट ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्याच्या या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी त्यांचे घरी प्रत्यक्ष भेट घेऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचे कौतुक केले. अतिशय कठोर परिश्रमातून रोशन ने मिळवलेले यश हे अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सारंग गिरसाळवे, अब्दुल वकील, जयप्रकाश पांडे, सुरेश लेखराजानी, प्रकाश हावडा, भावना हावडा यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पो. डा. वार्ताहर, परभणी : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेराजगार युवक-युवतींसाठी या अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 14 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा श्री मंगल कार्यालय, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ स्टेशन रोड, परभणी येथे आयोजीत करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास 30 नामांकित मोठे उद्योजक/कंपन्या…
पो. डा. वार्ताहर, धुळे : शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांच्या दारी पोहोचत असल्याने ‘शासन आपल्या दारी’ अभियानास राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहेत. या अभियानात धुळे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या मदतीने आणि सहकार्याने राज्य शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ योजनेस आणि धुळे महापालिकेच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून धुळे – नरडाणा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
हिराई विश्राम गृहात अधिका-यांशी बैठक, कामगारांच्या मागण्या सोडविण्याच्या सूचना पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णीक विज केंद्राच्या राख वाहिनींमधुन राख गळती सुरु आहे. ही राख शेतक-यांच्या शेतात जात असुन शेत पिकांचे आणि शेत जमीनींचे मोठे नुकसाण होत आहे. हा गंभीर प्रकार असुन ही गळती तात्काळ थांबवत सिएसटीपीएसच्या राखेमुळे शेतपिकांचे नुकसाण होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे. विविध विषयांना घेऊन आज हिराई विश्राम गृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत त्यांनी या सूचना केल्या आहे. या बैठकीला सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, उपमुख्य अभियंता शाम…
नागपूर येथे आयोजित फॉरेस्ट किट बॅग व वाहन वितरण समारंभ संपन्न पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : – महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून कामात झोकून द्यावे. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काल (शनिवार) दिली. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वतीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते फॉरेस्ट किट बॅग व वाहन वितरण करण्यात आले. यावेळी एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य व्यवस्थापक (नियोजन) संजीव गौर, महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) रवींद्र…
पो. डा. वार्ताहर, नागपूर : कविता ही मानवी संवेदना आहे. तिचा प्रत्यय काळाप्रमाणे बदलत असतो. आपण ज्या मानसिकतेत असतो त्यानुसार आपल्याला त्या कवितेचा प्रत्यय येत असतो. डॉ. उपेंद्र कोठेकर हे एक सिद्धहस्त कवी आहेत आणि त्यांच्या कवितेत सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब जागोजागी बघायला मिळते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ व ‘काठावर दूर नदीच्या’ व डॉ. मनीषा कोठेकर यांच्या ‘उंबरठ्यापल्याड’ या लेख संग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित या…