- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो. डा. वार्ताहर , जळगाव : जळगाव जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिलिंद दुसाने व माहिती अधिकारी पदाचा कार्यभार सुरेश पाटील यांनी आज स्विकारला . जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांच्याकडे देण्यात आला आहे. माहिती अधिकारी श्रीमती शैलजा देशमुख यांची डहाणू येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर उप माहिती कार्यालय, शिर्डी, जि.अहमदनगर येथील माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे जागतिक लोकसंख्या दिन जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविष्कार खंडारे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्राची नेहुलकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके, सरपंच, पुजा मानकर, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रृगारे, वैद्यकिय अधिकारी, डॉ.आशिष वाकडे, प्रा.आ.केंद्र, दुर्गापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश गेडाम, डॉ.अमित जैसवाल आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी एक कुटुंब एक बालक संकल्पना रुजवा अन्यथा लोकसंख्या वाढत गेल्यास देश अधोगतीकडे…
पो. डा. वार्ताहर , वाशिम : २६ जुन हा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमच्या वतीने ३ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे दक्षता पथक कॅम्प आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यामातून ३५ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. कॅम्पच्या माध्यमातून तात्काळ प्रकरणे निकाली काढण्यासाठी चौकशी अहवाल समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. १० जुलै रोजी सेवा…
पो. डा. वार्ताहर , वाशिम : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(आयटीआय) वाशिम येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-2023 करीता प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया 12 जुन 2023 पासून सुरू आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण इच्छुक विदयार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशिम येथे एकुण 12 व्यवसाय व 24 तुकडया उपलब्ध आहेत. यामध्ये 4 व्यवसाय 2 वर्ष मुदतीचे विजतंत्री,जोडारी, आर.ए.सी व यांत्रीकी मोटारगाडी आणि 8 व्यवसाय 1 वर्ष मुदतीचे वेल्डर, बेसीक कॉस्मेटोलॉजी फुड प्रोडयशन, फॅशन टेक्नॉलॉजी,कारपेंटर,मेकॅनिक डिझेल,अॅटो इलेक्ट्रीशन व इलेक्ट्रानिक्स व कोपा आहे. यामध्ये एकूण 428 उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रत्येक व्यवसायात स्त्री उमेदवारांना 30 टक्के प्रवेश…
पो. डा. वार्ताहर परभणी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उभारण्यात आलेल्या दर्गा रोड परिसरातील नवीन स्त्री व नवजात रुग्णालयाचे डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. सुभाष रोड, परभणी या परिसरात कार्यान्वित असलेले जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय आता आज (दि.10 जूलै) पासून स्री व नवजात शिशु रुग्णालय (एमसीएच विंग) म्युनिसीपल कॉलनी, बँक कॉलनीच्या बाजुला, दर्गा रोड, परभणी येथील नवीन इमारतीत स्थलांतरित करुन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील माता व बालकांना आता उपचारासाठी बाहेरील जिल्ह्यात जाण्याची गरज पडणार नाही. तसेच या…
पो. डा. वार्ताहर , नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना (Nashik Crime News) शुक्रवारी दुपारी शिंदे गावातील शिवरत्ननगर या ठिकाणी घडली आहे. जनाबाई भिवाजी बर्डे (वय 45) असे हत्या झालेल्या मांत्रिक महिलेचे नाव आहे तर निकेश दादाजी पवार (वय 41, रा. जेलरोड) असे हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शिंदे गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके? जनाबाई बर्डे ही महिला शिंदे गावात राहत्या घरात सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील रुग्ण तिच्याकडे…
महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरूड झेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणीकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती काम करेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्यावतीने आज सादरीकरण करण्यात आले. तसेच हा अहवाल मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ‘फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे. याकरिता महाराष्ट्राने आपले योगदान देण्यासाठी या आर्थिक परिषदेची स्थापना केली. परिषदेने कमीत कमीत वेळेत अहवाल सादर केल्याबद्दल या तत्परतेची मुख्यमंत्री श्री.…
पो. डा. वार्ताहर : नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एक महिला जखमी असल्याचे समजते आहे.
पो. डा. वार्ताहर: उद्योग जगतासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2023 (सीडीसीपीआर)’ तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योगांना चालना मिळेल. उद्योग जगतासाठी ही नियमावली फायदेशीर असून राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा, मुख्य नियोजिका डॉ. प्रतिभा भदाणे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक यावेळी मोठ्या…
मालवण तालुक्यातल्या तोंडवली गावात चक्क वाघांचं मंदिर आहे. पो. डा. वार्ताहर : या व्याघ्रमंदिरात स्वयंभू शिवलिंगा बरोबर वाघांच्या दोन समाधीही आहेत. गावकरी या समाधींचं मनोभावे दर्शन घेतात. पर्यावरण रक्षणाचा आगळा आदर्शच या गावाने घालून दिला आहे कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिनभिनता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो. याच…