Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर नागपूर : कौशल्य केंद्र आपल्या दारी या संकल्पनेतून नागपूर विभागातील नामांकित उद्योग, उद्योजक संघटना, मोठे कामगार, कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत 17 सप्टेंबर रोजी कवीवर्य सुरेश भट सभागृहात ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध उद्योजकांना आवश्यक ते कुशल, अकुशल मनुष्यबळ प्राप्त होणे, उद्योग, आस्थापनांसाठी मनुष्यबळाच्या मागणीची मोफत जाहिरात प्रसिध्द करणे, उद्योजकांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार प्राप्त करणे सोईस्कर होणे तसेच शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य, समन्वय साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , बुलडाणा : नेहरु युवा केंद्र आणि सहकार विद्या मंदिर यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा उत्सव शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सहकार ऑडीटोरीयम येथे थाटात पार पडला. उत्सवाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुकेश झंवर, मृत्यूंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांडगे, प्रा. हरीश साखरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा कांदे, प्रा. सागर गवई, प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे, प्रा. निता बोचे उपस्थित होते. आमदार श्री. गायकवाड म्हणाले, शहर सुंदर, स्वच्छ निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. झोपडपट्टीतील सामान्यवर्गातील 300 मुलांसाठी यावर्षीपासून सीबीएससी शिक्षण सुरु केले आहे. युवकांनी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  रत्नागिरी :- राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीने रत्नागिरी विभागातील सर्व बसेसची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यात येते. महामंडळाच्या अभियांत्रिकी खात्याकडील पंचसूत्री तत्वानुसार कार्यपध्दतीचा अवलंब व परिक्षण करुनच प्रत्येक बस मार्गावर प्रवासी वाहतुकीकरिता वापरण्यात येते. प्रवाशांना सुखकर व सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग व राज्य परिवहन महामंडळ सदैव कटिबध्द राहील. प्रवाशांनी आणि विविध समाज घटकांनी तसेच प्रसार माध्यमांनी महामंडळाच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक पी. एस बोरसे यांनी केले आहे. राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराचे चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , वाशिम : जिल्हयात एकूण 1 लक्ष 68 हजार 91 गोवर्गीय पशुधन आहे. आजपर्यंत 1 लक्ष 59 हजार 404 जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण पुर्ण झाले आहे. तरी देखील वाशिम तालुक्यात 4, मालेगांव तालुक्यात 1, मंगरुळपीर तालुक्यात 1 व रिसोड तालुक्यात 1 असे एकूण 7 गोवंशीय जनावरांचा या लम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे. याकरीता पशुसंवर्धन विभागाकडून या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरीत संपर्क साधावा. बाधित जनावरे कळपातील निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था देखील वेगळी करण्यात यावी. बाधित जनावरांची वाहतूक करु नये.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , वाशिम : क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जगात दर दोन मिनिटात क्षयरोग प्रतिबंध औषधी न घेणारे तीन क्षयरुग्ण दगावत आहे. या रोगाचा फैलाव टाळणे व प्रत्येक क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा, औषध विक्रेते आणि वैद्यकीय व्यावसायीकांनी आरोग्य खात्याकडे त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानानुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी कळविले आहे. भारतीय राजपत्रानुसार १९ मार्च २०१८ च्या खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा व खाजगी औषध विक्रेत्यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे. परंतू काही खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय बुलडाणा व बुलडाणा जिल्हा एथेलेटिक असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने एचआयव्ही एड्स जनजागृती करिता बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या सुरवातीला एचआयव्ही, एड्सबाबत आणि तंबाखू नियंत्रणाची शपथ घेण्यात आली. युवक आणि एचआयव्ही, एड्सबाबत माहिती, तसेच टोल फ्री क्रमांक १०९७ बाबत माहिती देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. स्पर्धेत १०६ मुलामुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेत मुलांमधून प्रथम सुजित जाधव, द्वितीय…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध व अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींकरीता कर्ज/अनुदान/प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती/नवबौद्ध आणि अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र व्यक्तींकरीता पुढील नमुद केलेल्या योजना कार्यान्वीत आहे. विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना – या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींसाठी विविध कुटीर उद्योगाकरीता ५० हजार रुपयापर्यंत बँकामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत १० हजार अनुदान दिल्या जाते व उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरुपात असते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याकरीता महामंडळास…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , वाशिम : प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी www.navodaya.gov.in किंवा http://www.cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावर भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात. नोंदणीकृत उमेदवारांकरीता ऑनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी दूरुस्ती खिडकी शेवटच्या तारखेनंतर दोन दिवस उघडण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिंग, प्रवर्ग, क्षेत्र, अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम या क्षेत्रामध्ये दूरुस्ती करता येईल. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १२ लाख ४० हजार निरक्षर नागरिकांना शोधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण शिक्षण विभाग करणार आहे. शिक्षण विभागातर्फे शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी आवश्यक प्रपत्रेही पुरविण्यात आली आहेत. दरम्यान निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे आहे. शिक्षकांना प्रत्यक्ष वस्ती, वाडी,…

Loading

Read More

अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या १०३ व्‍या जयंतीनिमित्त कार्यक्रम अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहीणार पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर, दि. २८ – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका विशिष्ट वर्गाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विचारांची व कार्यकर्तुत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मातंग चेतना परिषद विदर्भ प्रदेशाच्‍या वतीने आयोजित लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या १०३ व्‍या जयंतीनिमीत्त १०३ विद्यार्थ्‍यांच्‍या व ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या सत्‍कार सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुसद येथील प. पू. गजानंदजी माऊली, भागवताचार्य मनिषजी…

Loading

Read More