Author: Police Diary

परभणी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 10.1 मि.मी. पावसाची नोंद पो डा. प्रतिनिधी, परभणी, : जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी केवळ 10.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात (16.5 मिमी) झाला असून, त्याखालोखाल सोनपेठ व मानवत (12.7), पुर्णा (10.7), सेलू (9.9), परभणी (9.4 मिमी) झाला आहे. याशिवाय गंगाखेड (8.3 मिमी), पाथरी (6. मीमी ) आणि जिंतूर तालुक्यात (6.2 मिमी) पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या 24 तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही 12.2 मिमी राहिली आहे. पीक विम्याची अग्रीम भरपाई मिळण्यासाठी २१ दिवसांचा पावसाचा खंड हा एक प्राॅक्सी ट्रिगर आहे. असे आणखी ५ प्राॅक्सी ट्रिगर आहेत.…

Loading

Read More

पो डा. प्रतिनिधी, चंद्रपूर, : दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी 28 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय संयुक्त पथकामार्फत आदेश निर्गमित झाले आहेत. राज्यातील व जिल्ह्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दूध भेसळीच्या प्रकारावर कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीत अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त(अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकामार्फत 6 सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या…

Loading

Read More

पो डा. प्रतिनिधी, चंद्रपूर, : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, चंद्रपूरमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत मातंग समाजातील, अनुसूचित जातीतील हिंदू-मांग, मातंग व तत्सम 12 पोट जातीतील अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाकडून त्यांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. चालू आर्थिक वर्षात बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत रु. 50 हजार ते 7 लक्षपर्यंत जिल्ह्यात 30 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 45 टक्के तर लाभार्थी सहभाग 5 टक्के तर बँकेच्या कर्जाचा सहभाग 50 टक्के असतो. महामंडळाच्या रकमेवर 4 टक्के…

Loading

Read More

पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर : चंद्रपूर येथील जनसंवाद यात्रेत मोठ्या प्रमाणात मुलींनी उस्फूर्तपणे समोर येत सहभाग दर्शविला ले मशाली चल पडे है ,लोग मेरे गाव के ,अब अंधश्रद्धा दूर करेंगे लोग मेरे गाव के. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्याहून अधिक काळ संघटित रित्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे .डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी या समितीची स्थापना केली. सुरुवातीला मुठभर कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे .डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्गुण खुनानंतर देखील अत्यंत निर्धाराने हे काम दशक भर चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रगतशील विचारांचा वारसा आहे. इथली संत…

Loading

Read More

पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर , चंद्रपूर: वाहतूक अडवून अपघातस्थळी दिली श्रध्दांजली शहरातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी एकाच दिवशी 3 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था व जड वाहनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. नागपूर महामार्ग बंगाली कॅम्प व मूल मार्ग तसेच बायपास रस्त्यावरील जीवघेणे अपघात रोखण्याच्या मागणीसाठी आता जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.आज दुपारी 12 वाजता संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख,महिला आघाडीच्या मनीषा बोबडे व युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत अनिता ठाकरे यांना त्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी वाहतूक अडवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिसांनी…

Loading

Read More

जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शिक्षण दिन साजरा प्रशांत रामटेके, पोलीस डायरी प्रतिनिधी, पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, उमरी पोतदार येथे ०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘स्वयंशासन उपक्रमाचे आयोजन’ करण्यात आले. गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली…

Loading

Read More

भागवत ज्ञान कथा कार्यक्रमात सहभाग पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर :  कित्येक युगे लोटली, पण प्रत्येक युगात भागवत कथेचे, आध्यात्माचे महत्त्व कायम आहे. ईश्वराच्या साधनेने प्राप्त होणारी ऊर्जा कायम आहे. त्यामुळे तुम्हाला जर मन तंदुरुस्त ठेवायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तीर्थरुपनगर येथील राधेश्याम मंदिरात आयोजित भागवत ज्ञान कथा कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.मयूर महाराज, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, भाजयुमोचे सुनील डोंगरे, अंबादास पिंपळकर, रामचंद्र डोंगरे,  प्रभाकर राऊत, एकनाथ दरवेकर, भारती बोभाटे, नीलिमा तळवेकर, चंद्रशेखर झिलपे, गोवर्धन…

Loading

Read More

17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड: 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे सत्कार समारंभ पो.डा. जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र मशारकर चंद्रपूर, दि. 4 : सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. जिल्ह्यातील एकूण 17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून यात प्राथमिक विभागाचे 15 तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक : पांडूरंग मेहरकुरे, माधव…

Loading

Read More

चंद्रपूर: बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन पो.डा. जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र मशारकर , चंद्रपूर,: चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागते होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.…

Loading

Read More

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ५ कोटी ३९ लक्ष मंजूर पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर  , चंद्रपूर : खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावी, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता चंद्रपुरात सर्व सोयीसुविधायुक्त असा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ५ कोटी ३९ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलानंतर विभागातील दुसरा वातानुकुलित बॅडमिंटन हॉल चंद्रपुरात होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर येथे सिनीयर राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप…

Loading

Read More