- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
- नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
- बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
- वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत
- माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
- सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
Author: Police Diary
जिल्हा विकास आराखडा सभा यंत्रणांनी केले आराखड्याचे सादरीकरण अनेकांनी मांडल्या जिल्ह्याच्या विकासाच्या सूचना पो.डा. वार्ताहर , वाशिम : जिल्ह्यातील प्रति व्यक्ती उत्पन्न वाढविण्यासाठी विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.जिल्ह्याच्या एकंदरीत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात सर्वांचे योगदान महत्वाचे राहणार असल्याचे मत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केले. आज 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास आराखडा कार्यशाळेत त्या बोलत होत्या.सभेला उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, गोखले इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ.प्रशांत बनसोडे,योगेश पायलीमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, विकास आराखड्यातून सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनेमुळे…
उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे सीईओची आकस्मिक तपासणी धडक :अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा पोलीस डायरी प्रतिनिधी, नागपूर, : शहरातील आरोग्य यंत्रणेला उर्जीत केल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा तपासणे सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयात आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची तपासणी व औषध साठ्याची खातरजमा केली. जिल्ह्यात ग्रामीण भागात 13 तालुका आरोग्य केंद्र, 11 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 316 उपकेंद्र असा प्रचंड मोठा ताफा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची काळजी घेताना या यंत्रणेला येणाऱ्या अडचणी यावेळी श्रीमती शर्मा यांनी जाणून घेतल्या. उप…
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवर निवड संधी : सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे पोलीस डायरी, प्रतिनिधी परभणी: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला, परभणी यांच्या विद्यमानाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळाव्यामध्ये उद्योजक, तंत्र प्रशाला नारायण चाळ स्टेडीयम परिसर परभणी येथे बुधवार दि.13 रोजी जागेवर – निवडसंधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत Just Dial परभणी या कंपनीमध्ये सेल्स व मार्केटिंग या पदा करिता भरती करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मोहिमे अंतर्गत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
आयुष्मान भव व विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा पोलीस डायरी, वाशीम प्रतिनिधी : ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड हे अत्यंत उपयुक्त आहे. जिल्हयातील कोणताही पात्र लाभार्थी आयुष्मान कार्डपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत आयुष्मान कार्ड जवळच्या सीएससी केंद्र, आशा सेविका, आपले सरकार केंद्र व अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र तसेच संकेतस्थळावर मोफत काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे. 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयुष्मान भव मोहिम आणि विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम 2023 ची दुसरी फेरी तसेच एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले…
मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाज रस्त्यावर उतरेल : विदर्भ तेली समाज महासंघ पोलीस डायरी, चंद्रपूर प्रतिनिधी,चंद्रपूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली…
पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवास स्थानी अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमातून शेकडो गरजूंना मायेचा घास भरविल्या जात असल्याचे म्हणत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीला दररोज घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. सदर उपक्रमाला राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली असून उपक्रमाचे कौतूक केले आहे. कुटुंब निरोगी तर समाज…
कथित स्वच्छ नाशिकची लपलेली अस्वच्छता आली चव्हाट्यावर सुव्यवस्थेचे वाजवले बारा: कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे जनता त्रस्त अधिकारी मस्त !!! योगेश भट, पोलीस डायरी, ब्युरो चिफ,नाशिक: सर्वत्र महाराष्ट्रात पावसाचा अतिवृष्टीचा इशारा मिळालेला असतानाही निद्रिस्त असलेले नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी काही केल्या काम करेना झालेत. साधारणपणे सर्वत्र पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे, पण नाशिक मनपातील सिडको घरकुले कार्यक्षेत्रात असलेल्या विभागीय कार्यालय मात्र याला अपवाद आहेत. स्मार्ट सिटी च्या चुरशीच्या सामन्यात सहभागी असताना कर्मचाऱ्यांच्या कामचुकारीमुळे मनपा ला मागे पडावे लागेल असे एकंदरीत चित्र आहे. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहे. अशात स्वच्छतेकडे दुर्लक्ष…
चंद्रपुरात पाहिले वैदर्भीय कलावंत सम्मेलन: वैदर्भीय कलावंत संमेलनात विदर्भातील ११ जिल्ह्यातील कलावंतांची उपस्थिती प्रशांत रामटेके पोलीस डायरी, प्रतिनिधी चंद्रपूर: झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील नाटयपंढरी म्हणून ओळखली जाते. विदर्भात सर्वात जास्त मनोरंजन कर हा झाडीपट्टी रंगभूमीमधूनच राज्य शासनाला प्राप्त होतो. तरीही झाडीपट्टी रंगभूमी ही ग्रामीण आदिवासी बहुमुलखातील हौशी रंगभूमी असल्यामुळे येथील कलावंत मुंबई – पुण्यापर्यंत कधीच पोहचू शकला नाही. येथील ग्रामीण कलावंतांच्या कलेला जागं करुन वैदर्भीय लोककला जिवंत ठेवण्याचे काम मायबोली झाडीपट्टी रंगभूमी गेली दोनशे वर्षा पासून करीत आहे. येथिल हौशी कलावंतांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कलेला प्रसिद्धी मिळावी, स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, या हेतूने दिनांक पाच सप्तेबर रोजी चंद्रमणी नॅशनल…
पो डा प्रतिनिधी,वाशिम: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज हे महाराष्ट्र अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी अधिनियमानुसार सुचिबद्ध केले आहे.या समितीस कायद्यातील तरतुदीन्वये चौकशी करतेवेळी सक्षम प्राधिकार्यास, अपील प्राधिकरणास व पडताळणी समितीस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 चे दिवाणी न्यायालयास असलेले सर्व अधिकार बहाल केले आहे.जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमाणपत्राकरिता अर्जदाराकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी लागते.वेळेत त्रुटी पूर्तता केली नाही तर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येतात.खोट्या पुराव्याने कोणालाही जात वैधता प्रमाणपत्र देता येत नाही. जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणी पैशाची मागणी केल्यास त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र…
सोयाबीन पिकांवरील पिवळा मोझँक व्हायरसचे असे करावे व्यवस्थापन: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पो. डा. प्रतिनिधी चंद्रपूर, : जिल्ह्यात यावर्षी 66 हजार 931 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीन हे एक महत्वाचे पीक आहे, त्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन सुध्दा करणे गरजेचे आहे. मागील वर्षी पिवळा मोझँक व्हायरस रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझँक व्हायरस / हिरवा मोझँक व्हायरस हा रोग प्रामुख्याने फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत विषाणुजन्य रोगाची लागण होते. म्हणजे फुले लागल्यानंतर दिसून येतो व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. अंदाजित 30-90 टक्के उत्पादनात नुकसान या रोगामुळे होऊ शकते, तसेच…