- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
- नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
- बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
- वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत
- माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
- सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
Author: Police Diary
उपचाराबाबत जरांगेना एक न्याय व रविंद्र टोंगेंना एक न्याय हा भेदभाव खपवून घेणार नाही : ओबीसींचा सरकारला इशारा पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन कायम आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर उपोषण मंडपात दाखल झाले. टोंगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात हलवण्याचा आग्रह प्रशासनाने धरला. मात्र, मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्यावर मंडपात उपचार आणि ओबीसी समाजाचे टोंगे यांना रुग्णालयात हलविण्यासाठी आग्रह का ? असा प्रश्न ओबीसी समाजबांधवांनी उपस्थित केला. यानंतर टोंगे यांच्यावर मंडपात…
पो.डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न त्याग आंदोलनात साथ दिली. दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. भाजपचे देवराव भोंगडे, राहुल पावडे, आशिष ताजने कोरपना, मनोज पोतराज,ओबीसी जनगणना परिषद चे बळीराज धोटे, भावसार समाजाचे डॉ नंदकिशोर नंदवलकर व त्यांचे सहकारी, तैलीक समाजाचे, ऍड विजय…
पो.डा. जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर , चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, याविरोधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी, दुसऱ्या दिवशीही त्यांचे आंदोलन कायम होते. दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष (वैद्यकीय आघाडी) डॉ. संजय घाटे टोंगे यांची भेट घेतली. टोगे यांच्या वेंडली या मूळ गावातील सुमारे ८० महिलांसह शेकडो गावकरी हेदेखील उपोषणात सहभागी झाले होते. दिवसभरात आंदोलनात सहभाग नोंदविणाऱ्यांमध्ये डॉ. संजय घाटे, अॅड. अविनाश टावरी, अॅड. संजय मुनघाटे, शुभांगी…
विकास आराखड्यासाठी विभागानी सूचना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी जिल्हा केंद्रबिंदू मानण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची बलस्थाने ओळखून प्रत्येक विभागाने आर्थिक विकासासाठी अल्प आणि दिर्घ कालावधीसाठी पाच सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्याच्या विकास आराखडा संदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, गोखले इंस्टिट्यूटचे प्रा. नरेश बोडके उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याची बलस्थाने, कमजोरी आणि त्यानुषंगाने करावयाच्या कार्यवाही संदर्भात सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासानुसार प्रत्येक विभागाने नियोजन करावे. यात जिल्ह्याचे बलस्थाने आणि कमजोरी लक्षात घ्यावी. जिल्ह्यात…
बुलडाणा जिल्हाधिकारीपदी डॉ. किरण पाटील रूजू पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा: जिल्हाधिकारी पदी डॉ. किरण पाटील रूजू झाले आहेत. त्यांनी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारली. जिल्ह्याची बलस्थाने ओळखून विकासात्मक कामे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर विविध विभागाप्रमुखांशी संवाद साधला. समस्या जाणून प्राथम्याने कामकाजाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती, त्यावरील उपाययोजना, आपतग्रस्त शेतकऱ्यांना करावयाची मदत याबाबत आढावा घेतला. विभागप्रमुखांनी सक्रीय कामकाज करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यानुसार येत्या दहा-वीस वर्षाचा कालावधीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम स्वरूपात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्याला नवीन दिशा…
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित ना . मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी मानले आभार पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर, दि. १२ – चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील शिवभक्तांसाठी आराध्य दैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानचा विकास व्हावा, या राज्य संरक्षित स्मारकामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मा.ना.सुधीर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून मंदिराच्या संवर्धनासाठी व सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. नुकताच ना. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १४ कोटी ९३ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर…
सदरदार पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : शिक्षणामुळे आयुष्यात सकारात्मक विचारांचा संचार होतो. नकारात्मक विचार दूर होतात. शिक्षण ही विकासाची प्रक्रिया आहे. त्यामुळे उच्च शिक्षित होऊन या प्रक्रियेचा भाग बना, महाविद्यालयीन जिवन तुमच्या आयुष्यातील सुर्वण काळ आहे. याचा उपयोग योग्य करत विद्यार्थ्यांनो ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालय गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, प्राचार्य डॉ. पी. एस. काटकर, सदस्य दिनेश पटेल, उपप्राचार्य माधव शेट्टीवार, सांस्कृतिक प्रमुख सुमेधा श्रीरामे आदी…
पोलीस डायरी रिपोर्टर, बॉलीवूड, ९ अक्तू. : नुसरत भरुचा इजरायल में फंसने के बाद अब इंडिया वापस आ चुकी हैं। हाइफ़ा अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव में शामिल होने के लिए इजरायल पहुंची थी नुसरत लेकिन अचानक इजरायल और फिलिस्तीन के बीच युद्ध शुरू होने के वजह से उन्हें फंसना पड़ा। नुसरत का अपने टीम से संपर्क भी टूट गया था। संपर्क टूटने से परिवार वाले और फैंस काफी परेशान हो गए थे। वैसे अभी वे इंडिया पहुंच चुके हैं। नुसरत भरुचा के इंडिया वापस आने से हर कोई खुश हैं लेकिन इसी बीच मशहूर फिल्म समीक्षक केआरके ने नुसरत पर निशाना…
पो.डा. वार्ताहर , वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ” शासन आपल्या दारी ” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम. या उपक्रमाच्या माध्यमातून गतिमान शासनाची प्रचिती नागरिकांना व लाभार्थ्यांना येत आहे.शासनाच्या विविध योजनांची केवळ माहितीच नाही तर योजनांचा लाभ घेऊन शासकीय यंत्रणा या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या दारी पोहोचत आहे. कोणताही पात्र लाभार्थी हा आपल्या विभागाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणा जीव ओतून काम करताना दिसत आहे.कारंजा तालुक्यातील 8 महसूल मंडळाच्या ठिकाणी त्या मंडळाच्या कार्यक्षेत्रातील गावांसाठी जून व जुलै 2023 या महिन्यात घेण्यात आलेल्या शिबिरातून 49 हजार 300 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. शासनाच्या अनेक…
*17 कोटींची मदत होणार वितरीत पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांपैकी ईकेवायसी झालेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पिक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरीत 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7 हजार 641 लाभार्थी,…